राज्यात खासगी डेअरी चालकांकडून गायीच्या दूधखरेदीदारात वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील खासगी डेरी चालकांनी गाईच्या दुधाच्या खरेदी दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दुधाला बहुतेक डेअरी प्रकल्पांकडून प्रति लिटर 26 रुपयांपर्यंत दर दिला जात आहे अशी माहिती डेअरी उद्योग सूत्रांनी दिली आहे.कोल्हापूर सांगली भागात यापूर्वीच दुधाच्या खरेदी दरात वाढ होऊन ती प्रतिलिटर 27 रुपयांपर्यंत गेली होती. अलीकडेच दूध भुकटी व लोण्याचे भाव वधारले नंतर दुधाच्या दरात वाढ करण्यास वाव आहे अशी चर्चा खाजगी डेअरी चालकांमध्ये सुरू झाली. त्यामुळे एक बैठक घेत सर्व खासगी प्रकल्पांनी एकत्रितपणे दुध दरवाढीवर शिक्कामोर्तब केलं. परिणामी प्रतिलिटर 23 ते 24 रुपये असलेलया दुधाच्या खरेदीवर 21 नोव्हेंबरपासून 26 रुपयांपर्यंत हा दर गेला आहे.

राज्य शासनाच्या दुग्धविकास सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश कुतवळ यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या दुधाचे दर कमी होण्याची भीती दिवाळीपूर्वी वाटत होते सुदैवानं तसं काही घडलं नाही भुकटी व लोण्याला चांगले दर मिळत असल्याने दूध खरेदी 26 रुपयांपर्यंत वाढ झालेल्या दुधाच्या वाढत्या दरांना खाजगी व्यवसायिकांमधील स्पर्धा कारणीभूत आहे.

दुधाचे दर आणखी वाढण्यास पूरक स्थिती असल्याचेही डेअरी उद्योग आला वाटतं. त्याच्यात खाजगी दूध प्रकल्पांकडे 70 टक्के दुधाची खरेदी केली जाते. आमच्या मते अजून दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही दुधाला दर चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून दुभत्या जनावरांना पशुखाद्य देण्याचे प्रमाणही वाढेल परिणामी एकूण दूध उत्पादन देखील वाढू शकेल.