हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे . आपण जशी पिकांची काळजी घेतो त्याचप्रमाणे जनावरांची देखील काळजी घेतली पाहिजे. पशुधनावर सध्या प्रचंड प्रमाणामध्ये पिसवांचा प्रादुर्भाव होत आहे.
१)पिसवांचा प्रादुर्भाव आढळल्यास पशुधनास आहे त्या गोठ्यापासून काही काळासाठी दुर अंतरावर बांधावे.
२)त्या गोठयातील जाळै/जळमटे स्वच्छ करावेत व या गोठयामध्ये 4% मिठाचे द्रावण सर्वत्र फवारावे.
३)लागण झालेल्या पशुधनावरती 5% निंबोळी अर्क अथवा वनस्पतीजन्य किटकनाशकाचे द्रावण (15 मिली निंबोळी तेल + 15 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम साबण + 1 लिटर पाणी) फवारावे
४) अथवा पशुवैद्यक तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली रासायनीक किटकनाशकाची फवारणी करावी.
असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या तज्ञ ररसमितीकडून देण्यात आला आहे.