हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात (Kanda Bajar Bhav) सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. मात्र आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात अल्प सुधारणा झाली आहे. मागील आठवड्यात कांद्याला सरासरी 1400 ते 1600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र आज कांद्याचे सरासरी दर 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. अल्प का होईना सुधारणा झाल्याने कांदा (Kanda Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आजचे राज्यातील कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav Today 9 Jan 2024)
लासलगाव बाजार समितीत आज कांद्याची 8670 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 800 रुपये तर सरासरी 1850 रुपये प्रति क्विंटल, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज कांद्याची 14400 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2191 ते किमान 400 रुपये तर सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल, येवला बाजार समितीत आज कांद्याची 10000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1861 ते किमान 300 रुपये तर सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल, विंचूर बाजार समितीत आज कांद्याची 9800 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2068 ते किमान 900 रुपये तर सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल, मालेगाव (मुंगसे) बाजार समितीत आज कांद्याची 13000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1950 ते किमान 800 रुपये तर सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
मुंबई बाजार समितीत आज कांद्याची (Kanda Bajar Bhav) 13161 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2200 ते किमान 1500 रुपये तर सरासरी 1850 रुपये प्रति क्विंटल, सातारा बाजार समितीत आज कांद्याची 216 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2100 ते किमान 1000 रुपये तर सरासरी 1550 रुपये प्रति क्विंटल, कळवण बाजार समितीत आज कांद्याची 4500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2190 ते किमान 800 रुपये तर सरासरी 1501 रुपये प्रति क्विंटल, पुणे-मोशी बाजार समितीत आज कांद्याची 541 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1500 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
आवक वाढली
दरम्यान, केंद्र सरकारने डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीची घोषणा केल्यानंतर कांदा दरात सातत्याने घसरण होऊन, ते हंगामातील निच्चांकी पातळीवर पोहचले होते. मात्र चालू आठवड्यात राज्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात अल्प का होईना पण सुधारणा झाली आहे. त्यातच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवकही मागील आठवड्यात तुलनेत काहीशी वाढली आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या दरातील अल्प सुधारणेमुळे शेतकऱ्यांनी आज बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आणल्याचे दिसून आले.