Kharif Sowing: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने खरीप पेरणीसाठी ‘या’ वाणांची केली शिफारस!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने खरीप पेरणीसाठी (Kharif Sowing) तूर, मूग, भुईमुग, उडीद, मका पिकांच्या वेगवेगळ्या वाणांची (Kharif Crop Variety) शिफारस केलेली आहे.

राज्यात खरीप हंगाम (Kharif Season) तोंडावर आला आहे. मराठवाड्यात पूर्व मशागतीचा शेवटचा टप्पा संपत आला असून शेतकरी खरीप पिकांच्या वेगवेगळ्या बियाण्यांची जमवाजमव करत आहेत. दरम्यान, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने (VNMKV) खरीप (Kharif Sowing) पिकांच्या या वाणांची शिफारस केली आहे.

मराठवाड्यात आज पासून पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाची हजेरी राहणार असून शेतकर्‍यांना खरीपाच्या पेरणीसाठी (Kharif Sowing) कोणत्या वाणांची निवड करावी याविषयी संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. कापूस बियाणांच्या वाणांसाठी शेतकरी आक्रमक झाले असताना शेतकर्‍यांना एकूणच खरीप वाणांच्या निवडी संदर्भात परभणी कृषी विद्यापीठाने शिफारसी केल्या आहेत. जाणून घेऊ या शिफारस केलेले वाण.

खरीपाच्या पाच पिकांसाठी करा या वाणांची निवड

कापूस:  पिकाच्या लागवडीसाठी वाण  निवडताना जमीन व हवामान, कोरडवाहू  किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा विचार करून वाणांची निवड करावी (Kharif Sowing).

तूर: पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-2013-41(गोदावरी), बीडीएन-711, बीएसएमआर-736, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-716,  बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), एकेटी 8811, पीकेव्ही तारा किंवा आयसीपीएल 87119 इत्यादी वाणांचा वापर करावा.

मूग: पेरणीसाठी कोपरगाव, बीएम-4, बीपीएमआर-145, बीएम-2002-1, बीएम-2003-2, फुले मुग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4 इत्यादी वाणांचा वापर करावा.

उडीद: लागवडीसाठी बीडीयू-1, टीएयू-1, टीपीयू-4 इत्यादी वाणांचा वापर करावा.

भुईमूग: पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123  इत्यादी वाणांचा वापर करावा.

मका: पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, युवराज इत्यादी वाणांचा वापर करावा.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.