हॅलो कृषी ऑनलाईन: जेव्हा तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये कॉफी (La Bae Mushroom Coffee) प्यायला जाता, तेव्हा तुम्ही अनेकदा कॅपुचिनो, लाटे, एस्प्रेसो, बोर्बन आणि इतर चवीच्या कॉफीची ऑर्डर देता. पण तुम्ही कधी ‘मशरूम कॉफी’ (La Bae Mushroom Coffee) बद्दल ऐकलं आहे का?
‘ला बे’ (LA Bae) मशरूम कॉफी (La Bae Mushroom Coffee) पावडर ही केरळमधील पहिली कॉफी पावडर आहे, जी मशरूमच्या पोषणाने समृद्ध आहे. या प्रिमियम मशरूम कॉफी ब्रँडला जगभरात प्रचंड मागणी आहे.
कोविड 19 दरम्यान नोकरी गमावल्यानंतर शेफ लालू थॉमस (Lalu Thomas) यांनी UAE हॉटेल मध्ये ही कॉफी तयार केली होती. त्यानंतर ती केरला मध्ये कशी आली जाणून घेऊ या यशोगाथेतून (Success Story).
मशरूमचा व्यवसाय सुरू केला
केरळमधील (Kerala) लालू थॉमस 15 वर्षे दुबईमध्ये शेफ म्हणून काम करत होते, परंतु 2019 मध्ये त्यांची नोकरी गेली आणि ते घरी परत आले. परत आल्यानंतर त्याच्या प्रोफाईलनुसार त्याला नोकरी मिळत नव्हती. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लालूनी मशरूमची शेती (Mushroom Farming) करण्याचा निर्णय घेतला. तो जिथे राहत होता, तिथे मशरूमला फारशी मागणी नव्हती. आता लालूना त्यांच्या कौशल्यानुसार काहीतरी करायचे होते.
मशरूम कॉफी स्टार्टअप
मशरूमला जास्त मागणी नाही हे बघून त्यांनी अशा परिस्थितीत स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. व मशरूम कॉफी (La Bae Mushroom Coffee) बनवायचे ठरवले. लालूनी केरळमधील कोल्लम येथील कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला. त्याच्याकडे संशोधन करण्याची विनंती केली. त्यांच्या स्टार्टअपसाठी त्यांनी प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस योजनेंतर्गत मिळालेल्या 10 लाख रूपयांची मशिनरी बसवली.
45 वर्षीय लालू थॉमस यांना मशरूम कॉफी पावडर (La Bae Mushroom Coffee) तयार करण्यासाठी सुमारे 2 वर्षे लागली. लालू थॉमस यांनी 5 प्रकारच्या मशरूमचे मिश्रण करून ही कॉफी पावडर तयार केली आहे.
ला बे मशरूम कॉफीची खासियत
ला बे ही केरळची पहिली कॉफी पावडर (La Bae Mushroom Coffee) आहे जी मशरूमच्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. फूड रिसर्च अँड डेव्हलपमेंट कौन्सिल आणि काजू एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या लॅबमध्ये लालूच्या प्रिमियम कॉफी पावडरचे मूल्यांकन आणि तपासणी करण्यात आली.
या कॉफीचे मिश्रण नेहमीच्या कॉफीसारखेच असते परंतु त्याची चव वेगळी असते आणि थोडासा मातीचा सुगंध असतो. मशरूम कॉफीमध्ये रेग्युलर कॉफीपेक्षा कॅफिनचा अधिक टिकाऊ स्रोत आहे.
ला बे मशरूम कॉफी पावडरमध्ये 70 टक्के मशरूम आणि 30 टक्के कॉफीचे मिश्रण असते.
ला बे कॉफीला आहे जगभरात मागणी
लालूच्या कंपनीला अबुधाबीच्या फूड प्रोसेसिंग फ्यूचर स्टार कंपनीकडून 250 किलोची ऑर्डर मिळाली. अनेक शीर्ष जागतिक ब्रँड देखील LA Bae कॉफीची ऑर्डर देत आहेत परंतु कच्च्या मालाची उपलब्धता यासाठी मुख्य अडचण आहे. लालू मशरूम कॉफी बनवण्यासाठी महाराष्ट्र, हरियाणा, ओडिशा येथून मशरूम घेतात, तर थॉमस यांच्याकडे स्वत:ची झाडे नाहीत म्हणून ते वायनाडमधून कॉफी विकत घेतात.
लालू थॉमसच्या मशरूम कॉफी (La Bae Mushroom Coffee) मध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिजर्वेटिव नसल्यामुळे या कॉफीची शेल्फ लाइफ 12 महिने आहे.
महाराष्ट्रात अनेक शेतकरी मशरूमची लागवड करत आहेत. त्यांना जर वेगळ्या व्यवसायात प्रयत्न करून बघायचे असल्यास ला बे मशरूम कॉफी चांगला पर्याय आहे.