हॅलो कृषी ऑनलाईन : शेती कामांमध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून घेतल्यास त्यांना खांदेसुजी हा आजार होतो. खांदे सुजी ही प्रामुख्यानं मानेवरील जू मानेस सतत घातल्यामुळे होते. शेती काम करताना मानेची कातडी जू व जुवाला असणारी खीळ यामध्ये चेंगरते आणि खांदेसुजी होते. आपल्याकडे असणारी बैल जोडी ही अनेकदा कमी-जास्त उंचीची असते त्यामुळे जनावरांच्या मानेवर ठेवले जाणारे जू हे समांतर राहत नाहीत. परिणामी जु हे तिरके सोडण्यात येते त्यामुळे दोन्ही बैलांना खांदेसुजी चा आजार होतो.
लक्षणे
— खांद्यावरील भागावर भयंकर सूज येणे
— सूज ही खांद्याची कातडी व त्याखाली त्वचेच्या भागावर येणे.
— जू ओढताना खांद्याची कातडी ही मागच्या बाजूस जोराने ओढली गेल्यामुळे कातडी खालील पडदा वेगळा होऊन त्वचेखाली रक्त साचते.
— खांद्यावरील सूज गरम व अत्यंत वेदनादायी असते.
— सुजेचा आकार हा लिंबू ते फुटबॉल एवढा असतो.
— सूज मऊ , पाणी असणारी ते कडक लागणारी असू शकते.
–सुजेतून फुटून पाणी येऊ शकते.
— खांद्यावर सूज आल्यामुळे बैल काम करू शकत नाहीत.
— खानदेश सूची झालेल्या बैलाला आराम दिल्यास सूज कमी होते कामाला जुंपल्यास पुन्हा वाढते.
–खान्देसूज झालेला बैल विना उपचारास कामास झोपल्यास कातडीवर लहान लहान जखम होऊन बेंड येतात.
उपचार
— खानदेशी सुजी ची लक्षणे जनावरात दिसल्यास पशुवैद्यकाकडून उपचार करावा.
— नुकत्याच झालेल्या खांदे सुजित सुजलेल्या भागावर चार ते पाच दिवस खांदे सूज कमी करणारे मलम लावावे.
— ताज्या सुजिस बर्फाने तीन ते चार दिवस शेकावे
— मॅग्नेशियम सल्फेट, ग्लिसरीन मध्ये मिसळून खांद्यावर लावल्यास नुकतीच आलेली सूज कमी होते.
— जुन्या सुजिसाठी गरम वाळू कपड्यात गुंडाळून चार ते पाच दिवस शेक द्यावा. गरम पाण्याने सुद्धा शेक दिला तरी चालतो.
–शेकी देताना जनावरास पोळणार नाही याची खात्री करून घ्यावी. अन्यथा त्वचा भाजण्याची शक्यता असते. गरम पाणी किंवा भुस्सा याचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा थोडं जास्त असावा. यासाठी गरम पाणी, वाळू, भुशाचा प्रथम आपण स्पर्श करुन पहावा त्याचे तापमान कमी आहे याची खात्री होईल.
–खांद्यावर आलेल्या गाठींमधून पू येत असेल तर पशुवैद्यकाकडून छोटी शस्त्रक्रिया करून घेऊन त्यातील पू काढून टाकावा आणि त्याचे रोज ड्रेसिंग करावे.
— उपचार करत असणाऱ्या जनावरास कामास जुंपून नये आणि पूर्ण आराम द्यावा
— औषधोपचाराने जर खांद्यावरील गाठी कमी होत नसतील तर खांद्यावर पशुवैद्यकाकडून छोटीशी शस्त्रक्रिया करून या काढून टाकाव्यात त्यानंतर योग्य औषधोपचार व काळजी घ्यावे.