हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळ्याचे वेध लागताच हळूहळू लिंबाच्या दरात घसरण (Lemon Processing Business) होताना दिसून येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना यातून आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. हीच बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लिंबू प्रक्रिया उद्योगाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरत आहे. विशेष म्हणजे औषधी गुणधर्म असलेले लिंबू आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. लिंबापासून अनेक उपयुक्त असे पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे महिला बेरोजगार आणि बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण लिंबू लोणचे प्रक्रिया उद्योगाबाबत (Lemon Processing Business) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
लिंबाचे लोणचे गोड आंबट तिखट अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाते. लोणचे तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली पिवळ्या रंगाची व मोठ्या आकाराची फळे (Lemon Processing Business) निवडावीत. व स्वच्छ धुवून फडक्याने कोरडी करावीत. लोणचे तयार करताना जितकी जास्त स्वच्छता राखली जाईल. तितके चांगल्या प्रतीचे लोणचे तयार होते. व ते खराब होत नाही. लिंबू स्वच्छ धुऊन व कोरडे करून घेतलेल्या लिंबाच्या स्टीलच्या तीक्ष्ण सुरीने चार सारख्या फोडी कराव्यात. व त्यातील बिया काढाव्यात.
प्रति किलो लिंबासाठी लागते ‘हे’ साहित्य? (Lemon Processing Business)
लिंबाचे गोड लोणचे तयार करण्यासाठी प्रामुख्याने 1 किलो लिंबू, 120 ग्रॅम मीठ, 50 ग्रॅम आले (बारीक तुकडे), याशिवाय हळद, बिलायची, मिरे, बडीशेप, लाल तिखट प्रत्येकी 15 ग्रॅम तर लवंग 5 नग, गुळ 700 ते 800 ग्रॅम या सर्व पदार्थांची आवश्यकता असते.
कृती आणि साठवणूक प्रक्रिया?
काचेची बरणी स्वच्छ करून नंतर ती गरम पाण्याने धुऊन कोरडी करून कडक उन्हामध्ये 3 ते 4 तास उलटी करून ठेवावी. स्टीलची मोठी थाळी घेऊन त्यामध्ये प्रथम लिंबाच्या फोडी घेऊन त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्याव्यात. गुळाचा शेगडीवर मंद आचेवर पाक करून घ्यावा व स्टीलच्या चाळणीने गाळून घ्यावा थोडा थंड झाल्यास तो लिंबाच्या फोडी वर टाकावा. दुसरीकडे बडीशेप, लवंग, मिरे भाजून बारीक कुटून घ्यावे. (लिंबाचा बारीक किस + गुळ + मीठ + मसाला) एकत्रित करून शिजवावे व तो घट्ट होईपर्यंत शिजवावे नंतर ते थंड करावे. उन्हामध्ये ठेवलेल्या रुंद तोंडाच्या भरणीमध्ये हे लोणचे भरावे झाकण घट्ट लावून ते स्वच्छ व कोरड्या ठिकाणी ठेवावे.
काय आहेत लिंबाचे औषधी गुणधर्म?
सकाळी उठल्यावर लिंबू-पाणी व मध घ्यावे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळे पचनसंस्था सुरळीत चालते. लिंबामध्ये पेक्टिन तंतुमय घटक आहे. या तंतुमय पदार्थांच्या नियमित सेवनाने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. हृदयविकार होण्याची ही संभावना कमी होते. पाण्यात लिंबाचा रस व जिऱ्याची पूड घालून पिल्यास यकृताचे रोग बरे होतात.