बदलत्या हवामानात पशुधनाची काळजी महत्वाची ; अशा प्रकारे करा कडुनिंबाचा प्रभावी वापर

Neem
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यंदाच्या वर्षी उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. विदर्भ मराठवाड्यात तरी तापमान ४५अंशांपर्यंत पोहचले आहे. माणसाला नाकीनऊ करून सोडणाऱ्या या उष्णतेचा पशुधनावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळयात तुमच्या पशुधनाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा याचा परिणाम आपल्या दुग्धव्यवसायावर होऊ शकतो. आजच्या लेखात आपण अशा काही टिप्स बघूया ज्या तुमच्या पशुधनासाठी उपयुक्त ठरतील.

ह्या गोष्टी लक्षात ठेवा

–जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा.
–पशुधनाकडून सकाळी 11 ते दूपारी 4 यादरम्यान काम करून घेऊ नये.
–उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे.
–पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा.
–पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे.
–तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर न्यावे.
–पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
–वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये.
–निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी.
–पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.
— पाऊस चालू होण्‍याच्‍या वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

कडुनिंबाबाचा प्रभावी वापर

पशुधनातील उत्पादनवाढीसाठी त्यांना होणारा गोचीड, गोमाशा, उवा, पिसवा यांचा प्रादूर्भाव कमी करणे आवश्यक आहे. यासाठी उन्हाळा ऋतूमध्ये कडू निंबाच्या वृक्षाच्या पूर्ण पिकून खाली पडलेल्या निंबोळ्या गोळा करून सावली मध्ये वाळवून साठवून ठेवाव्यात व दर महिन्यामध्ये एकवेळ 5% निंबोळी अर्क करून पधुधनास फवारावे.