Mashroom Farming : ऑयस्टर मशरूम शेती; शेतकरी मिळतोय कमी खर्चात अधिक नफा!

Oyster Mashroom Farming More Profit less Cost
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी मशरूम शेतीकडे (Mashroom Farming) वळत आहे. मशरूम शेतीमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे. विशेष म्हणजे रोजगाराची शाश्वत संधी उपलब्ध होत असल्याने, अनेक जण मशरूम शेतीचा मार्ग निवडत आहे. आज आपण अशाच एका मशरूम शेतीतील यशोशिखर गाठलेल्या शेतकरी नरेश चौहान यांच्या यशस्वी मशरूम शेतीबाबत जाणून घेणार आहोत. ज्यांनी देहरादून या ठिकाणी ऑयस्टर मशरूम शेतीचे (Mashroom Farming) युनिट उभारले आहे. ज्यातून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.

चार वर्षांपासून मशरूम उत्पादन (Oyster Mashroom Farming More Profit less Cost)

शेतकरी नरेश चौहान यांनी हे उत्तरप्रदेशातील गौतममबुद्धनगर येथील रहिवासी आहे. त्यांनी उत्तराखंड येथील डेहराडून या ठिकाणी आपल्या छोट्याशा जागेमध्ये मशरूम शेतीचा (Mashroom Farming) प्लांट उभारला आहे. गेल्या चार वर्षांपासून ऑयस्टर मशरूम शेतीमध्ये लाखोंची कमाई करत आहे. शेतकरी नरेश चौहान सांगतात, ऑयस्टर मशरूम शेती करताना भुसाची उपलब्धता असावी लागते. एक क्विंटल भुसामध्ये 10 ग्रॅम मशरूमचे बियाणे टाकून रोपं करावे लागते. ज्यापासून पुढील 20 ते 25 दिवसांमध्ये मशरूम मिळण्यास सुरुवात होते.

उत्पादन खर्च कमी, नफा अधिक

ऑयस्टर मशरूमची शेती करणे खूप फायदेशीर आहे. यातील पहिली बाब म्हणजे उत्पादन खर्च कमी असते. तर दुसरे म्हणजे बटन मशरूमच्या तुलनेत ऑयस्टर मशरूम शेतीतून तीन पट अधिक नफा मिळतो. जर तुम्हाला 1 किलोच्या बॅग तयार करण्यासाठी 30 ते 35 खर्च येत असेल. तर शेतकरी त्यातून 1 किलोहुन अधिक मशरूम उत्पादित करू शकतात. ज्याद्वारे शेतकरी 150 ते 200 रुपये प्रति किलोपर्यंतचा नफा मिळवू शकतात. तर एका रूममधून जवळपास 2 ते 2.5 क्विंटल मशरूम उत्पादन मिळते. अर्थात खर्च वजा जाता शेतकऱ्यांना प्रति किलो मशरूमपासून 100 ते 150 रुपये किलो फायदा मिळतो. त्यामुळे ऑयस्टर मशरूमची शेती तीनपट अधिक फायदेशीर मानली जाते.

दोन अडीच महिन्याचे पीक

शेतकरी नरेश चौहान सांगतात, ऑयस्टर मशरूम ही दोन अडीच महिन्याचे पीक असून, चांगले उत्पादन मिळवण्यासाठी खूप सावधानता बाळगावी लागते. म्हणजे मशरूम लागवड केल्यानंतर रूममध्ये पूर्ण साफसफाई ठेवावी लागते. ज्यामुळे रोगराईपासून मशरूम शेतीचा बचाव करण्यास मदत होते. ऑयस्टर मशरूम शेती ही जागेची कमतरता असणाऱ्यांसाठी फायदेशीर व्यवसाय आहे. ऑयस्टर मशरूम शेती ही वर्षभर केली जाऊ शकते. 12 बाय 10 च्या खोलीमध्ये शेतकऱ्यांना 7 से 8 हजार रूपये प्रति महिना कमाई होऊ शकते. व्यवसायाचा विस्तार केल्याने सध्या आपल्याला ऑयस्टर मशरूम शेतीमधून वार्षिक लाखोंची कमाई मिळत असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले आहे.