Monsoon 2022 : मान्सूनची एंट्री पाच दिवस आधीच होणार ; पहा महाराष्ट्रात कधी लावणार हजेरी ?

farmer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. परिणामी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची वाट सुकर झाली असून, दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात १५ मे रोजीच ते दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी वर्तविला. दरवर्षी मान्सून अंदमानात १८ ते २० मे या कालावधीत दाखल होतो . यंदा मात्र अनुकूल स्थितीमुळे हे वारे पाच दिवस आधीच येण्याची शक्यता आहे.

‘असनी’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच बंगालच्या उपसागरात बुधवारी सायंकाळी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. या पट्टय़ाचे १२ मे रोजी तीव्र कमी दाबाच्या पट्टय़ांत रूपांतर झाल्यामुळे आंध्र प्रदेश व रायलसीमाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी होत आहे. वाऱ्यांचा वेग किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किलोमीटर आहे. या सर्व घडामोडींमुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन सुकर होण्यास मदत झाली आहे. यामुळे यंदा हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापेक्षाही पाच दिवस आधीच र्नैऋत्य मोसमी वारे या भागात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र कधी होणार मान्सून दाखल?

यंदाच्या वर्षी मान्सून अंदमान मध्ये 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी दाखल होणार आहे तर केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन 27 मे रोजी ± 4 दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह होण्याची शक्यता आहे. तळकोकणात 27 मे ते दोन जून पर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात 16 मे पर्यंत उष्णतेची लाट

या अनुकूल स्थितीमुळे तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, लक्षद्वीप यासह ईशान्य भागातील नागालॅण्ड, मिझोराम, त्रिपुरा या भागांतही पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, महाराष्ट्रातील विदर्भ या भागांत १६ मेपर्यंत उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे.