महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सून दाखल; पुढचे 3 दिवस राज्यात अवकाळीचा इशारा

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. अशातच यंदाही मान्सून जोरदार बरसनारअ सल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

भारतात सलग तिसऱ्या वर्षी यंदाही मान्सून जोरदार बरसेल असा अंदाज असून त्याचे आगमन केरळमध्ये वेळेवरच म्हणजे 1 जून रोजी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आशिया खंडातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातही मान्सून सात ते आठ जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी 26 व 27 मे रोजी दक्षिण आशिया देशातील हवामान तज्ञांचे ऑनलाइन चर्चासत्र पार पडले. यात भारतासह जपान, कोरिया सहा-सात देश सहभागी झाले होते. या सर्व देशांच्या तज्ञानी यंदाचा मान्सून आपापल्या देशात कसा असेल तसेच दक्षिण आशिया भागावर याचा कसा परिणाम होईल याबाबत आपली मतं मांडली आहेत. सर्व देशातील तज्ञांच्या मते यंदा मान्सून लवकर येईल आणि सामान्य पेक्षा चांगला पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुढील 3 दिवस आवकाळी पाऊस

दरम्यान पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या तीन दिवसात राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या बहुतांश भागात हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तर काही भागांमध्ये मध्यम आणि जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

पुणे वेधशाळेच्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला आहे. मात्र उत्तर भागात तापमान वाढ झाली असून कमाल मर्यादा पर्यंत तापमान पोहोचत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता आगामी तीन दिवसांसाठी राज्याच्या बहुतांश भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रमुख्याने 30 एप्रिल 1 मे आणि २ मे रोजी पावसाचा अंदाज असून त्यानंतर हे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुणे ,कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्वच भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . यामध्ये प्रमुख स्थानांमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांमध्ये गारपीट व्हायची शक्यता देखील वेधशाळेनं वर्तवली आहे