Monsoon Update: उद्यापासून महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार वळीव पाऊस! ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ यांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: काल 30 मे 2024 रोजी मॉन्सून (Monsoon Update) केरळमध्ये दाखल झाले. यामुळे सगळीकडे विशेषत: शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात सुद्धा मॉन्सूनचे वेध लागले आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ (Weather expert) माणिकराव खुळे यांनी मॉन्सून महाराष्ट्रात (Monsoon In Maharashtra) केव्हा दाखल होणार याबाबत महत्त्वाची अपडेट (Monsoon Update) दिलेली आहे.

खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून अर्थातच एक जून पासून ते तीन जून पर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे (Weather Update).

या कालावधीत महाराष्ट्रातील जवळपास 29 जिल्ह्यांमध्ये वारा-वावधनासह गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवत असल्याचा अंदाज (Monsoon Update) त्यांनी दिला आहे.

मुंबई व कोकण विभाग वगळता महाराष्ट्रातील उर्वरित 29 जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे.

दुसरीकडे मुंबई सह कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये एक जून पर्यंत ढगाळ आणि दमट युक्त उष्णतेचे वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच आज मराठवाडा आणि खानदेशात उष्णता सदृश्य लाट पाहायला मिळणार आहे (Monsoon Update).

आज खानदेश मध्ये रात्री सुद्धा उकाडा जाणवणार आहे. मॉन्सूनने केरळमध्ये (Kerala Monsoon) तर प्रवेश केलाच आहे शिवाय पूर्वोत्तर भागातील सात राज्यांमध्येही तो पोहोचला आहे.

मॉन्सूनने केरळ राज्याच्या टोकावरील सक्रियतेनंतर उर्वरित केरळाचा बराचसा भाग, कन्याकुमारी, दक्षिण तामिळनाडू, मालदीव व लक्षद्वीप भागापर्यंत काल अर्थातच 30 मे रोजी मजल मारली आहे.

तसेच पुढे देखील मॉन्सूनचा असाच वेगवान प्रवास पाहायला मिळणार आहे. यामुळे पुढील आठवड्यात मॉन्सून महाराष्ट्रात येऊ शकतो असा अंदाज (Monsoon Update) आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.