हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान खात्याने देशातील वेगवेगळ्या राज्यातील हवामान अंदाज (Monsoon Update) सांगीतला आहे, त्यानुसार या आठवड्यात जम्मू-काश्मीर, हरियाणा-चंडीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तुरळक ते मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस (Light To Medium Rain) पडू शकतो.
देशातील अनेक राज्यांमध्ये मॉन्सूनच्या पावसाच्या (Monsoon Update) कहरामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याने (IMD) मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून अनेक राज्यांमध्ये अलर्टही (Monsoon Alert) जारी केला आहे. हवामान खात्यानुसार, या आठवड्यात जम्मू-काश्मीर, हरियाणा-चंडीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तुरळक ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
हवामान खात्याचा अंदाज (Monsoon Update)
हवामान खात्यानुसार, 14 ते 19 ऑगस्ट दरम्यान हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये विखुरलेल्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय 14 ऑगस्टला पंजाबमध्ये, 14 ते 19 ऑगस्ट दरम्यान उत्तराखंडमध्ये, 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान पश्चिम राजस्थान आणि हरियाणा-चंडीगडमध्ये, 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान पूर्व राजस्थानमध्ये आणि 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान जम्मू विभागात पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने पूर्व राजस्थानमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे (Monsoon Update) .
असा असणार महाराष्ट्रातील पाऊस (Maharashtra Monsoon Update)
हवामान खात्यानुसार विदर्भात तुरळक ते मुसळधार पाऊस पडू शकतो. या आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे (Monsoon Update).
सध्या जरी राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी उद्या 15 ऑगस्टपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो असे हवामान विभागाने सांगितले आहे. 22 ऑगस्टपर्यंत हळूहळू पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ महिना अखेरपर्यंत चालू राहील अशी माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस अधिक झाल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत.