Nelore Cattle : भारतीय गाय ठरली ब्राझीलमध्ये सर्वात महाग गाय, किंमत 40 कोटी रुपये!

Nelore Cattle Most Expensive Cow
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी दुग्ध व्यवसाय (Nelore Cattle) करतात. सध्याच्या घडीला जातिवंत दुधाळ गायींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. भारतात सध्या 40 ते 70 हजार रुपयांमध्ये दुधाळ गायी उपलब्ध होत आहे. मात्र, आता एखाद्या गायीची किंमत 40 कोटी रुपये आहे. हे ऐकल्यास तुम्हांला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र हे तंतोतंत खरे असून, ब्राझीलमधील एका लिलाव पद्धतीने विकत घेतलेल्या गायीला चक्क 40 कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. त्यामुळे ही ‘नेलोर’ किंवा नेल्लूर प्रजातीची गाय (Nelore Cattle) आतापर्यंतची जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे.

महागड्या कारपेक्षाही अधिक किंमत (Nelore Cattle Most Expensive Cow)

जगातील महागडी कार म्हणून ओळख असलेल्या ‘बुगाटी’ या कारपेक्षाही ही गाय महागडी आहे. ब्राझील नुकत्याच झालेल्या गायीचा लिलावात ‘व्हिएटिना-19 एफआयव्ही मारा इमोव्हिस’ नावाची नेलोर गाय (Nelore Cattle) 4.8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 40 कोटी रुपयांना विकली गेली आहे. ब्राझीलमध्ये नेलोर गाय व्हिएटिना या नावाने ओळखली जाते. व्हिएटिनाची गायीची लिलावातील किंमत केवळ तिची वैयक्तिक किंमतच दर्शवत नाही. तर जनावरांच्या जागतिक बाजारात नवीन मानक स्थापित करून, जातिवंत गायींची गुणवत्ता सुधारण्यासाठी तिच्या अनुवांशिक गोष्टींची देखील क्षमता दर्शवते.

‘नेलोर’ गाय ही मूळची भारतीय

‘नेलोर’ प्रजातीच्या या गायीचा (Nelore Cattle) लिलाव साओ पाउलोच्या अरंडू येथे झाला. मागील वर्षी या गायीला मिळालेल्या किमतीपेक्षा, यावर्षी या गायीला अधिक किंमत मिळाली आहे. नेल्लोर प्रजातीची ही गायीची जात मूळची भारतातील असून, तिचे नाव आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. सध्या ती ब्राझीलमधील सर्वात महत्त्वाची गायींच्या जातींपैकी एक बनली आहे. या गायीची नर-मादी पहिली जोडी 1868 मध्ये जहाजाने ब्राझीलमध्ये पोहचली होती. त्यानंतर 1960 च्या दशकापासून त्या ठिकाणी या भारतीय गायींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

नेलोर गायीचे वैशिष्ट्ये

नेलोर गायीचे वैज्ञानिक नाव बॉस इंडिकस आहे. ही गाय उष्ण हवामान, उत्तम रोग प्रतिकारशक्ती आणि मांसाचा दर्जा यांसारख्या उत्तम गुणांनी परिपूर्ण आहे. ही गाय ताकद, लवचिकता आणि कठीण परिस्थितीत टिकाव धरून राहण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे या गाईला उष्णकटिबंधीय भागात अत्यंत महत्त्व आहे. नेल्लोर जातीची कोणत्याही वातावरणात जुळवून घेते. तसेच भरपूर दूध देखील देते. या गायींचे वैशिष्ट्य म्हणजे प्रखर उन्हातही ही गाय आरामात राहू शकते. या गायींच्या अंगावर संपूर्ण पांढरा रंग असतो जो सूर्यप्रकाश परावर्तित करतो. या गायीची त्वचा खूप कठीण असते. परिणामी रक्त शोषणारे कीटक या गायीवर हल्ला करत नाही.