यापुढे कोणत्याही साखर कारखान्याला हमी नाही, अजित पवारांची सभागृहात मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे या वेळी सभागृहात विविध मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आज सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यात टोलेबाजी झालेली पाहायला मिळाली. विरोधक सध्या साखर कारखान्यांच्या बाबतीत सत्तेतील नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसून येत आहेत . आजही प्रवीण दरेकर यांनी यावरून अजित पवारांना सवाल केला. यावेळी बोलताना त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं की यापुढे कोणत्याही साखर कारखान्याला हमी देण्यात येणार नाही. याशिवाय साखर कारखाने काही विकत घेतले त्यातले काही कारखाने बंद आहेत या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी कर्ज काढले असे स्पष्टीकरण देखील अजित पवार यांनी दिलं.

याबाबत बोलताना पुढे म्हणाले की, आम्ही भेदभाव करत नाही एमएससी बँकेचा नफा नेट 400 कोटी रुपये आहे ते सांगताना पुढे त्यांनी कारखान्याला हमी देणार नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधक त्यांच्यावर कारवाई होणार असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले. सर्व प्रकारचे सहकारी नियम पाळूनच कारखान्यांना मदत करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. आम्ही आज असो अथवा उद्या नसो परंतु सहकारी संस्था कायमस्वरूपी मजबूत राहिल्या पाहिजेत. मधल्या काळात सहकारी कारखाना संदर्भात आरोप केले गेले परंतु सहकारी कारखाने चालवायला कोणी पुढे येत नाहीत असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. या वर्षी देशात राज्यांना साखरेची विक्रमी निर्यात केली आहे. आम्हाला चांगले जे झाले ते चांगलेच म्हणणार असेही ते म्हणाले.

रिकवरी लॉस आणि आणि ट्रान्सपोर्ट सबसिडी यंदा नाही
पुढे बोलतांना ते म्हणाले , जर यदाकदाचित मे महिन्याच्या पुढील कारखान्यात जायला लागले जर रिकवरी ढासाळली तर मागच्या काळामध्ये विलासराव देशमुख यांच्या काळातलं ते सरकार होतं त्यावेळी रिकवरी लॉस आणि आणि ट्रान्सपोर्ट सबसिडी त्या ठिकाणी दिली होती. पण ती आत्ता आम्ही देणार नाही अशी माहिती अजित पवार यांनी दिली. हा विचार आम्ही शेवटीशेवटी करू कारण जर ऊस शिल्लक राहिला तर हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. यंदा आत्ताच्या तारखेपर्यंत दरवर्षी होतं त्याहीपेक्षा जास्त क्रशिंग झाले आहे. राज्यातील काही कारखाने हे एप्रिल आणि मे महिन्यात सुद्धा चालणार आहेत. अशी माहिती पवार यांनी दिली.