दिवाळी तोंडावर…! बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीचा सण आणि रब्बी पेरणी तोंडावर आल्यानं बाजार समित्यांमध्ये चालू आठवड्यात सोयाबीनची आवक वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक कमीच असून प्रक्रिया प्लांटवर थेट खरेदी ही वाढली आहे. देशभरातील बाजार समित्यांमध्ये 12 ते 13 लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीनची आवक होत आहे. महाराष्ट्रात सरासरी 3500 ते 5000 रुपये, मध्यप्रदेशात 4000 ते 5500 रुपये आणि राजस्थानमध्ये 4700 ते 5400 रुपयांपर्यंत दर मिळत आहे अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात सोयाबीनची आवक वाढत आहे. देशभरातील बाजार समित्यांमध्ये बुधवारी दिनांक 27 रोजी आतापर्यंतचे सर्वाधिक आवक झाल्याचा दावा केला जात आहे. राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने सोयाबीन काढणीच्या कामाला विलंब होत होता मात्र आता सर्वच भागात सोयाबीन मळणीने वेग घेतला. यंदा हंगामाच्या प्रारंभीच चांगले दर असल्याने शेतकऱ्यांना दराची आशा होती मात्र केंद्राच्या विविध कारणांनी दर घसरले. त्यामुळे पुढील काळात तरी दर वाढतील का अशी अपेक्षा न अनेक शेतकरी सोयाबीन मागे ठेवत होते मात्र दिवाळीचा सण आल्याने बाजारात आवक वाढत आहे परंतु आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मी आहे.

प्रक्रिया प्लांट्सना सोयाबिन विक्रीचा शेतकऱ्यांचा कल

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळीच्या दहा दिवस आधीपासून 70 ते 80 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होती मात्र सध्या तीस ते चाळीस हजार क्विंटलची आवक होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. तसेच अकोला बाजार समितीतही यंदा आवक निम्मीच आहे. गेल्या हंगामात सोयाबीन मधून व्यापाऱ्यांना चांगला लाभ झाला. हा दर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया प्लांट्स वर मिळाला त्यातच बाजार समित्यांपेक्षा इथं अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी बाजार समित्यांना ऐवजी थेट प्रक्रिया प्लांट्स पुरवठा करत आहेत. लातूर विभागात प्लांट खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तसेच अकोला, वाशिम, नांदेड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांमध्ये प्लांट्सना थेट विक्री वाढली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील आवकेचा आकडा कमी दिसत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले आहे.