हॅलो कृषी ऑनलाईन : नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना बऱ्याचदा आपल्या शेतात विजेसंदर्भांत विविध अडचणी भासतात. लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे, विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे,तांत्रिक वीज हानी वाढणे,विद्युत अपघात,वीज चोरी यासारख्या समस्या येतात . मात्र आज आपण अशा एक सरकारी योजनेबाबत माहिती घेणार आहोत ज्यामुळे या समस्या उद्भवणार नाहीत.
आज आपण एक शेतकरी एक डीपी 2021 संबंधीच्या सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे, योजनेचे लाभ कोणते आहेत, अर्ज कुठे व कसा करायचा, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो हे अर्ज सध्या चालू आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अर्ज करू शकता . आणि तुमच्या स्वतःच्या शेतात डीपी बसवू शकता.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 14 एप्रिल 2014 रोजी झालेल्या एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता होती. तसेच 14ऑक्टोबर 2020 रोजी नवीन अद्ययावत मंजूर झाले आहे. महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन 2248 कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे.
एक शेतकरी एक योजनेचे फायदे –
–ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP 7,००० रुपये द्यावे लागतील.
–अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व 5,००० रुपये द्यावे लागतील.
एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम आवश्यक कागदपत्रे –
–आधार कार्ड
–मोबाइल नंबर
–शेताचे ७/१२ प्रमाणपत्र
–जातीचे प्रमाणपत्र
–बँक खाते क्रमांक
कसा कराल ऑनलाईन अर्ज ?
–अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ -https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=Marathi
–वर दिलेल्या वेबसाईटवर सर्वात आधी भेट द्या.
–तिथे तुमची भाषा निवडा
— त्यानंतर कृषी या पर्यायावर क्लिक करा.
–नवीन अर्जाची नोंदणी हा पर्याय निवडा
–त्यानंतर किती hp चा dp हवा ahe to आकडा टाका (3/5/7)
–त्यानंतर पुढे ‘ कृपया शेती पंप वीज पुरवठ्यासाठी खालील पैकी योजना निवडा” यामध्ये दोन पर्याय दिसतील. १) पारंपरिक वीजपुरवठा २) सौर ऊर्जा तर आपल्याला या पैकी ‘पारंपरिक वीजपुरवठा’ हा पर्याय निवडायचा आहे.
–त्यानंतर आपल्याला अटी आणि शर्ती यामध्ये दिसतील त्यामधला दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय म्हणजे ” पारंपारिक विज जोडणी साठी लागणाऱ्या निधीची तरतूद शासनातर्फे अथवा महसुली जमा रकमेनुसार उपलब्ध कृषी आकस्मिक निधीमधून होईपर्यंत मी प्रतीक्षा करेन प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार मला वीज जोडणी दिली जाईल हा पर्याय निवडायचा आहे. ”
— त्यानंतरच सबमिट या बटन वर क्लिक करायचा आहे.
–त्यानंतर येणारा पर्याय वाचून ok बटन वर क्लिक करा.
–त्यांतर पुन्हा तुम्हला 2 पर्याय दिसतील 1)individual 2)organization यापैकी पहिल्या पर्यायावर क्लिक करा.
–पुढील वैयक्तिक माहिती भरा.
–अर्जाच्या शेवटी generate otp यावर क्लीक करा. त्यानंतर तुमही अर्जात टाकलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी क्रमांक आपल्याला अर्जामध्ये भरायचा आहे. त्यानंतर ok करा. त्यानंतर या अर्जाची तुम्ही प्रिंट देखील घेऊन तुमच्या जवळ ठेवू शकता. तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर किंवा तुमच्या इमेल आयडीवर यासंदर्भात संदेश येईल.
हेल्पलाईन नंबर –
शेतकरी मित्रांनो जर आणखीही तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२०
महावितरण टोल-फ्री – १८००-१०२-३४