Onion Export To Bangladesh: बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारामुळे कांदा निर्यात प्रभावित; शेकडो ट्रक कांदा सिमेवर अडकला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: बांगलादेशात जाणारा कांदा सीमेवर (Onion Export To Bangladesh) अडकून पडलेला आहे. मागील काही दिवसांपासून बांगलादेशात माजलेली अराजकता (Bangladesh Violence) याचा प्रभाव शेजारील राष्ट्रांवर सुद्धा पडलेला आहे. यामुळे राजकीय वातावरणासोबतच देशातील आर्थिक संबंध सुद्धा प्रभावित होत आहेत. भारताला सर्वात मोठा फटका हा कृषी निर्यातीच्या (Agriculture Export) बाबतीत बसला आहे, कारण बांगलादेश येथे भारतातून सर्वात मोठी कृषि निर्यात होते. मागील काही दिवसाच्या घडामोडीमुळे भारतातून होत असलेली शेतमालाची निर्यात (Export Of Agricultural Produce) थांबली आहे.

बांगलादेश भारताकडून जवळपास 75 टक्के शेतमाल आयात करत असल्याने या घडामोडींनी दोन्ही देशांचे नुकसान होणार आहे. नाशिकमधून दररोज कांद्याचे 70 ते 80 ट्रक बांगलादेशला रवाना होतात (Onion Export To Bangladesh). नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना (Onion Farmers) बसणार आहे.  

शेतकऱ्यांवर कांदा कमी भावात विकण्याची नामुष्की येण्याची शक्यता

मागील आठवड्यात बांगलादेशकडे रवाना झालेले कांद्याचे (Onion Export To Bangladesh) शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकून पडले आहेत. कांद्याची वाहतूक थांबली असल्याचे कांदा निर्यातदारांनी सांगितले. हा कांदा कमी भावात कोलकत्यातच विकण्याची नामुष्की ओढवू शकते. 50 हजार टन कांद्याचा टप्पा पार करण्यापर्यंत भारतातील कांदा निर्यातदार व शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. यातील 85 टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातून जाणार होता. मात्र, सध्या सीमा बंद केल्याने कांद्याचे ट्रक जागच्या जागी थांबले आहेत. कांद्याची सर्वाधिक निर्यात (Onion Export To Bangladesh) थांबल्यानं रोजचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार थांबले आहेत.

दरम्यान, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहित बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारताची दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. यामुळे  कांद्याची वाहतूक (Onion Transport) होत नसल्याचं राजू शेट्टींनी पत्रात म्हटलं आहे. बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

भारतातून बांगलादेशात कांद्या व्यतिरिक्त सुती धागा, पेट्रोलियम उत्पादने, तांदूळ, सुती कपडे, सेंद्रिय आणि अजैविक रसायने यांची निर्यात होते.