हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. यंदा बदलत्या वातावरणामुळे खरिपातील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता उन्हाळी कांदा उत्पादनासाठी बीजोत्पादन शेतकरी करीत आहेत. मात्र त्यातही आता खराब वातावरणामुळे करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बीजोत्पादनाचा घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातील 90 टक्क्यांहून अधिक कांदा उत्पादक शेतकरी खरीप, लाल, रब्बीचा उन्हाळ कांद्याचे बियाणे घरगुती पातळीवर बीजोत्पादन घेण्यासाठी पसंती देतात. त्यासाठी दर्जेदार कांद्याची निवड करून त्याची कंद लागवड बियाणे तयार करण्यासाठी येतात. यावर्षी सुरुवातीपासूनच सततचे ढगाळ हवामान धुके आणि दबाव यामुळे पीक संरक्षण उपाययोजना करूनही काही उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्याची पात गोंडे येण्यापूर्वीच करपून नष्ट होऊ लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी हे डेंगळे नांगरून टाकले आहेत.
आता उन्हाळी कांदा संपुष्टात आला असताना पुन्हा अनेक शेतकरी शोध घेऊन वीज उत्पादन करण्यासाठी उन्हाळी कांदा शोधू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा विकून झाला असल्यानं कांदाच शिल्लक नसल्याने कांद्याचा बीजोत्पादन हे घटणार आहे. अजून सततचे ढगाळ हवामान धुके आणि संक्रांत उलटूनही दव पडत असल्याने या हवामानामुळे लाल उन्हाळी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. पुढील हंगामात बियाण्यांची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.