चांगले उत्पन्न देणाऱ्या पावसाळी भुईमूगाची लागवड

Rainy Peanuts
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात वापरले जाणारे शेंगदाणे कधी पिकवतात, कधी काढतात याचा विचार आपण कधी केला आहे का? जर नसेल केला तर चला तर मग जाणून घेऊया या पिकाविषयी सगळं काही. भुईमुगाची लागवड ही खरीप हंगामात जुने महिन्यातील दुसरा आठवडा ते जुलै महिन्यातील पहिला आठवड्या दरम्यान केली जाते. तसेच भुईमुगाची रब्बी पेरणी ही नोव्हेंबरमध्ये करतात. उन्हाळी भुईमूगाची लागवड ही 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या मध्ये होते. उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन हे खरिपातील भुईमुगापेक्षा दुप्पट असते.

भुईमुगाच्या उत्पादनासाठी जमीन ही भुसभुशीत, वाळूमय, हलक्या रंगाची मोकळी, पुरेसा चुना असलेली आणि मध्यम सेंद्रिय द्रव्य असलेली लागते. मध्यम किंवा हलक्या प्रतीच्या जमिनीतही भुईमुगाचे चांगले उत्पन्न येऊ शकते. भुईमुगाच्या पिकासाठी जमिनीची पूर्वमशागत करणे आवश्यक असते त्यासाठी जमिनीची उभी आडवी पद्धतीने नांगरणी करावी. आमी 3-4 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. भुईमुगाची लागवड ही सरी पद्धत किंवा सपाट वाफ्यात करावी.

आपल्याला 1 हेक्टर लागवडीसाठी 160 किलो बियाणे लागते. हे बी लागवड करताना 5-6 सेंटीमीटर जमिनीच्या आत हाताने किंवा पेरणी यंत्राने टाकावे. उभी आडवी पेरणी केल्याने भुईमुगाची वाढ व्यवस्थित होते व मधे मधे खाडे राहत नाही. पेरणीसाठी बियाणे हे जिवाणू संवर्धन केलेले वापरावे. फुलकिडे यासाठी 10 मिली डिमॅटोन 10 लिटर पाण्यात घालून फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळीसाठी सायपरमेथ्रीन 4 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे. पीक तयार झाले की त्याची पाने पिवळी पडू लागतात, शेंगांचे टरफले टणक बनते. अश्या वेळी तुम्ही हे पीक काढू शकतात.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7