Pigeon Pea Disease And Pest Management: ‘या’ पद्धतीने करा नोव्हेंबर महिन्यात तूर पिकावरील किडीं आणि रोगांचे एकात्मिक नियंत्रण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या तूर पिकात (Pigeon Pea Disease And Pest Management) फुलोरा ते शेंगा भरण्याची अवस्था सुरु आहे. या काळात पिकावर वेगवेगळ्या किडीं आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडी आणि रोगांचे वेळीच नियंत्रण केले नाही तर पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. जाणून घेऊ एकात्मिक नियंत्रण उपाय.

तूर पिकाचे कीड आणि रोग व्यवस्थापन (Pigeon Pea Disease And Pest Management)

  • पीक फुलोऱ्यापासून ते शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत असताना तूर पिकाला आवश्यकतेनुसार आणि उपलब्धतेनुसार पाणी द्यावे.
  • रसशोषक आणि इतर किडींचा अंदाज घेऊन प्रति हेक्टरी 5 याप्रमाणे कामगंध सापळे (Pheromone Trap) लावावेत.
  • शेतात पक्षांना बसण्यासाठी मचाण म्हणजेच इंग्रजी “T” आकाराचे पक्षी थांबे प्रति हेक्टरी 50 ते 60. उभारावेत.
  • तूर  पिकामध्ये वांझ (Pigeon Pea Sterility Mosaic) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच, रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
  • तुरीत वांझ रोगाचा (Pigeon Pea Disease And Pest Management) प्रसार कोळी किडीमार्फत होतो म्हणून त्याच्या नियंत्रणासाठी ॲझाडीरॅक्टिन (300 पीपीएम) 5 मिलि प्रति लिटर पाणी किंवा पाण्यात विरघळणारे गंधक (80 डब्ल्यूपी) 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत घाटेअळी/पसारी पतंग आणि फळमाशीच्या (Pod Borer) नियंत्रणासाठी निंबोळी अर्क (5 टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (300 पीपीएम) 50 मिलि किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (5 एसजी) 4.4 मिलि किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (18.5 टक्के एससी) 2 ते 3 मिलि प्रति 10 लिटर पाणी फवारणी करावी.
  • तूर पिकात तृणधान्याचे आंतरपीक घेतल्यास किडींचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते.
  • एच.एन.पी.व्ही.(HNPV) या जैविक कीडनाशकाचा वापर करावा.  
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.