PM Kisan Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पैसे काश्मीरच्या शेतकऱ्यांच्या खात्यात; 2 वर्षांपासून घोळ!

PM Kisan Scheme For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून पीएम किसान योजना (PM Kisan Scheme) राबवली जाते. या योजनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतीच्या भांडवलासाठी आर्थिक मदत दिली जाते. परंतु सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे लाभार्थी शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहत आहेत. याचाच प्रत्यय अमरावती जिल्ह्यात (PM Kisan Scheme) पाहायला मिळाला आहे.

82 शेतकऱ्यांना आर्थिक फटका (PM Kisan Scheme For Farmers)

पीएम किसान योजनेचे लाभार्थी अमरावतीमधील शहापूरचे आणि आर्थिक मदतीचे पैसे जम्मू-काश्मीरमधील शहापूरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात गेले आहे. हा घोळ अमरावती जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील शहापूर गावातील 82 शेतकऱ्यांचे दोन वर्षांचे अनुदान चक्क जम्मू काश्मीरच्या शहापूर गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचा हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणाची काही शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली आहे.

2 वर्षांपासून घोळ सुरूच

पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला 12 हजार रुपये अनुदान हे शेतकऱ्यांना दिले जाते. मात्र, गेल्या 2 वर्षांपासून अमरावती जिल्ह्यतील दर्यापूर तालुक्यातील शहापूर गावातील 82 शेतकऱ्यांचे अनुदान चक्क जम्मू काश्मीर येथील शहापूर गावात जात असल्याच समोर आले आहे. ज्या कोडवर पैसे जमा होत आहे. ते जम्मू काश्मीर येथील जेके असा कोड आहे. तेथील शहापूर गावात जात आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी गेल्या 2 वर्षांपासून तक्रार करत आहे. मात्र ते पैसे जाते कुठे हे कळत नव्हते.

विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार

आज अखेर ही आर्थिक रक्कम जम्मू काश्मीरला जात असल्याचा समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनुदान जम्मू काश्मीरला असे होऊ नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान याबाबतचा प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करू, असेही सुद्धा बच्चू कडू यांनी यावेळी म्हटले आहे.