Potato Price : बटाटा दरात मोठी वाढ; दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु!

Potato Price Increase In India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा मध्यावधी कालावधी (Potato Price) सुरु आहे. सध्याच्या घडीला चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून, आणखी तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया बाकी आहे. मात्र, अशातच अन्नधान्याच्या किमती वाढू नये. यासाठी गेल्या वर्षभरापासून केंद्रातील सरकार तारेवरची कसरत आहे. असे असूनही बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या सुगीचे दिवस आले असून, बटाटा दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याउलट गृहिणींचे बजेट कोलमडल्याची (Potato Price) ओरड सुरु झालेली पाहायला मिळत आहे.

उत्पादन घटीचा परिणाम (Potato Price Increase In India)

गेला वर्षभर देशात मॉन्सूनच्या पावसावर एल-निनोचा प्रभाव होता. ज्यामुळे दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक भागांमध्ये त्याचा बटाट्याच्या उत्पादनावर थेट परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात बटाट्याचे प्रमाण कमी आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे. या स्थितीमुळे बटाटाच्या दरात (Potato Price) वाढ होताना दिसत आहे. बटाट्याबरोबरच अन्य भाजीपाल्याची देखील आवक कमी झाल्याने, त्यांच्याही दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात यूपीतील आग्रा बाजार समितीत बटाट्याला घाऊक बाजारात 1,800 ते 1,900 प्रति क्विंटलचा दर मिळाला होता. ज्यात चालू आठवड्यात 2,700 प्रति क्विंटलपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. तर किरकोळ बाजारात बटाट्याचे दर 50 रुपये प्रति किलोपर्यंत वाढलेले पाहायला मिळत आहे.

दरात आणखी वाढ होण्याची शक्यता

बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, बटाट्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत बटाट्याच्या दरात आणखी 5 ते 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे बटाटा पिकाचे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. यामुळेच बटाट्याच्या उत्पादनात घट झाली आहे. याचा परिणाम दरांवर होत आहे. सध्या बटाट्याच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता बटाट्याचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत, बटाटा दर आणखी पाच सहा महिने चढेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोल्ड स्टोरेजची तपासणी सुरु

दरम्यान, बटाट्याच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. देशात उत्तर प्रदेशात सर्वात जा्त बटाट्याचे उत्पादन होते. किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोल्ड स्टोरेजची तपासणी सुरु केली आहे. कारण व्यापाऱ्यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये बटाट्याचा साठा केल्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीननंतर तपासणीच्या कामाला अधिक वेग येईल, अशी माहिती सांगितली जात आहे. बटाटा आणि भाजीपाल्याच्या किमती वाढत असल्यामुळे व्हेज थाळी महाग होत आहे.