Poultry Farming: वर्षाला 250 अंडी देणारी ‘प्लायमाउथ रॉक’ कोंबडी पाळा; कमी खर्चात जास्त नफा मिळवा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी जोड व्यवसाय (Poultry Farming) म्हणून अनेक व्यवसाय करत उत्पन्न घेत असतात. या कृषिपूरक व्यवसायांपैकी (Agri Business) कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry Farming) शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरत आहे. यातून शेतकरी वर्ग कमी खर्चात अधिक उत्पन्न काढू शकतो.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरोघरी केला जाणारा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन (Poultry Farming). कुक्कुटपालन करून शेतकरी अंडी, आणि मांस उत्पादन करण्याचा व्यवसाय करून चांगले उत्पन्न घेऊ शकतात. कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry Farming) अगदी कमी पैशातही सुरू करू शकणारा व्यवसाय आहे.

बरेचदा कुक्कुट पालकांना (Poultry Farmer) समजत नाही की त्यांनी कोणत्या जातीची कोंबडी (Chicken Breed) पाळावी. आज आपण अशाच एका कोंबडीच्या जातीबद्दल माहिती घेणार आहोत जी एका वर्षात 250 अंडी देते.

वर्षाला 250 अंडी

आपण ज्या कोंबडीबद्दल बोलत आहोत त्या कोंबडीचे नाव आहे ‘प्लायमाउथ रॉक’ कोंबडी (Plymouth Rock Chicken). ही कोंबडी एका वर्षात 250 पर्यंत अंडी घालू शकतात, त्यामुळे शेतकर्‍यांना बंपर नफा मिळवून देऊ शकते. या कोंबडीच्या एका अंड्याचे सरासरी वजन 60 ग्रॅम पर्यंत असते.

‘प्लायमाउथ रॉक’ कोंबडीची वैशिष्ट्ये

  • या कोंबडीचे वजन 3 किलोपर्यंत असते.
  • या कोंबडीचे कान लाल असतात, तर चोच पिवळी असते.
  • ही कोंबडीची अमेरिकन जात मानली जाते. तरीही भारतातील अनेक राज्यांमध्ये ते मुबलक प्रमाणात आढळते.
  • व्यवसायाच्या दृष्टीने, कोंबडीची ही जात भारतात खूप चांगली मानली जाते.
  • प्लायमाउथ रॉक चिकन भारतातील प्रत्येक राज्यात आढळते.
  • या कोंबडीला ‘रॉक बॅरेड रॉक’ (Rock Barred Rock Chicken) या नावाने सुद्धा ओळखले जाते.
  • या कोंबडीचे मांस देखील अतिशय चवदार आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानले जाते. त्यामुळेच त्याच्या मांसाची किंमत (Plymouth Rock Chicken Price) बाजारात जास्त असते.

शेतकरी बंधुंनो तुम्ही सुद्धा कोंबडी पालन व्यवसाय (Poultry Farming) करू इच्छित असाल किंवा नवीन प्रजातीची कोंबडी पालन करणार असाल तर ‘प्लायमाउथ रॉक’ कोंबडी एक चांगला पर्याय आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.