ठिबक सिंचन अनुदानासाठी राज्य सरकारकडून १७५ कोटी २९ लाख रुपये मंजूर

Pradhanmantri Krushi Sinchan Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकाची राज्यात अंमलबजावणी केली जाते. या घटकाअंतर्गत सूक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पूरक बाबी राबविल्या जातात. यामध्ये केंद्र सरकार कडून ६०% तर राज्य सरकार कडून ४०% असा हिस्सा असतो. राज्य सरकारने दिनांक १ जानेवारी २०२१ या नववर्षाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना या संदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने ठिबक अनुदानासाठी १७५ कोटी २९ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता ज्या ज्या शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित होते आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना आता अनुदान मिळवायचे आहे. त्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. Pradhanmantri Krushi Sinchan Yojana

वित्त विभागाने आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या मंजूर तरतुदीच्या ७५% अशा मर्यादित निधी वितरणास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारचे १०५ कोटी १७ लाख रुपये आणि राज्य शासनाचे ७० कोटी १२ लाख रुपये असा निधी आता शेतकऱ्यांना अनुदान म्हणून मिळणार आहे. तसेच हे अनुदान देत असताना २०१९-२०२० मधील प्रलंबित शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Pradhanmantri Krushi Sinchan Yojana

हे अनुदान महा-डीबीटी पोर्टलद्वारे वितरीत करावे, आधारसंलग्न असलेल्या बँक खात्यात ‘पीएफएमएस’ प्रणालीद्वारे जमा करावे अशाही सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. हे अनुदान मंजूर केल्यामुळे वर्षभरापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच या अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे.