Preet Tractor : शेतकऱ्यांसाठी ‘प्रीत 4049 ट्रॅक्टर’; कमी डिझेलमध्ये करतो अधिक काम!

Preet Tractor For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रित ट्रॅक्टर्स (Preet Tractor) ही एक भारतीय ट्रॅक्टर निर्माता कंपनी असून, ती शेतकऱ्यांसाठी कमी मेंटेनन्स खर्चामध्ये शक्तिशाली ट्रॅक्टर बनवते. प्रित कंपनीच्या ब्रँडमध्ये प्रीत 4049 ट्रॅक्टर हा अतिशय प्रसिद्ध ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर कमी डिझेल खर्चात, जास्तीचे काम करतो. तसेच त्याचा मेंटेनन्स खर्च देखील कमी आहे. हा ट्रॅक्टर खूपच आकर्षक असून, त्याचे बोनट एरोडायनामिक प्रकारचा आहे. आज आपण प्रीत 4049 ट्रॅक्टरबद्दल (Preet Tractor) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

प्रीत 4049 ट्रॅक्टरबद्दल (Preet Tractor For Farmers)

प्रीत 4049 ट्रॅक्टर हा तीन सिलेंडरमध्ये, चाळीस हॉर्स पॉवरमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय तो 2892 सीसी पावरफुल 4 स्ट्रोक डीआय इंजिनसह येतो. या ट्रॅक्टरच्या कुलिंगसाठी वॉटर कुलिंग सिस्टिम देण्यात आली असून, एअर फिल्टर मोठ्या आकारात कोरड्या प्रकारचे असून इंजिनला शुद्ध हवा देते. हा ट्रॅक्टर बॉश कंपनीचा असून, यामध्ये मल्टी सिलेंडर इनलाइन इंधन पंप देण्यात आला आहे. या ट्रॅक्टरचा गिअर बॉक्समध्ये 8 गिअर्स पुढील बाजूस तर दोन गिअर्स मागील बाजूस देण्यात आले आहेत. या ट्रॅक्टरचा कमाल वेग हा 31 किमी प्रति तास असून, शेतीच्या कामासाठी हा खूप उपयुक्त ट्रॅक्टर आहे.

प्रीत 4049 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

प्रीत 4049 ट्रॅक्टरला मागील बाजूस 13.86 प्रतितास कमाल वेग देण्यात आला आहे. या ट्रॅक्टरमध्ये 280 मिमीचा हेवी ड्युटी सिंगल ड्राय क्लच देण्यात आला असून, ड्युअल क्लचचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. हा ट्रॅक्टर मेकॅनिकल स्टीयरिंगसह उपलब्ध आहे. तुम्ही यामध्ये पावर स्टीयरिंग देखील निवडू शकतात. तसेच या ट्रॅक्टरला 1800 किलो वजन उचलण्याची क्षमता देण्यात आली असून, हायड्रोलिक पंप गीअर प्रकारचा आहे. या ट्रॅक्टरचे एकूण वजन दोन हजार 50 किलो असून, लांबी 3700 मीमी आणि रुंदी 1765 मीमी आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने एकूण 67 लिटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे.

किती आहे किंमत?

प्रित ट्रॅक्टर्स कंपनीने प्रीत 4049 ट्रॅक्टरची किंमत 4 लाख 80 हजार ते पाच लाख दहा हजार रुपये असून, ही किंमत एक्स शोरूम आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स वेगवेगळा असल्यामुळे, विविध राज्यांमध्ये या ट्रॅक्टरची किंमत वेगवेगळी पाहायला मिळू शकते.