हॅलो कृषी ऑनलाईन : ससा हा असा प्राणी (Rabbit Farming) आहे, जो प्रत्येक व्यक्तीला आवडतो. दिसायला अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे, जे पाहून लोकांचे मन आनंदाने आणि प्रेमाने भरून जाते.ससेपालन शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरू शकते. शेतीसोबत शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी ससेपालनाचा व्यवसाय करू शकतात. यातून मिळणारा फायदाही चांगला मिळू शकतो. आपण ससेपालन (Rabbit Farming) कसे करावे? व्यवस्थापन कसे करावे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
प्राणीप्रेमींचा ससा हा अतिशय गोंडस प्राणी आहे. शहरांमध्ये छंद म्हणूनही त्याचे संगोपन केले जाते. शिवाय व्यवसाय म्हणून देखील ससा पालन (Rabbit Farming) केला जातो. ससेपालन पिंजऱ्यात चांगले होऊ शकते. महत्वाचे म्हणजे पिंजऱ्यात स्वच्छता राहते. ससे पाळताना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी लाकडाचा भुसा टाका कारण त्यांना उकरण्याची सवय असते. भुसे टाकले की ससे तिथेच उकरत बसतील. म्हणजे बाहेर जाण्याची किंवा पळुन जाण्याची शक्यता कमी असते.
कसा सुरू करायचा ‘हा’ व्यवसाय? (Rabbit Farming)
सर्वप्रथम ससे व्यवसायासाठी अशी जागा निवडा. जिथे कमी वायू आणि ध्वनी प्रदूषण आहे. तसेच, 25 अंश सेंटीग्रेड तापमान आणि सूर्यप्रकाश असावा. कारण अशा ठिकाणी ससा व्यवसाय करणे सोपे जाते. अशा ठिकाणी ससे चांगले वाढतात. तुम्ही 10 मादी ससे आणि 2 नर सशांसह ससा पालन सहज सुरू करू शकतात. चांगल्या नफ्यासाठी किमान 100 ससे असावेत. जर तुम्हाला सशाच्या व्यवसायातून अधिक कमाई करायची असेल तर तुम्ही आणखी सशांचे संगोपन करु शकतात.
कोणता आहार लागतो?
सशाचा (Rabbit) आहार धान्य, गोळ्या किंवा पावडरच्या स्वरूपात असतो. हिरव्या चाऱ्यामध्ये सशांना ओट्स, बेरसीम, राई गवत इत्यादी खायला दिले जाऊ शकते. यांच्या पिल्लांना देखील धान्य बारीक करून खायला द्या. बुरशी लागलेले धान्य शक्यतो टाळा. कारण बुरशी धान्यात रोग असतात वेगवेगळे किटाणू असतात. यामुळे सस्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच ससेपालन (Rabbit farming) करणाऱ्याला सुद्धा आर्थिक नुकसान होऊ शकते.
काही प्रमुख जाती
सोव्हिएत चिंचिला, व्हाईट जायंट, ब्लॅक ब्राउन, न्यूझीलंड व्हाईट, ग्रे जायंट, अंगोरा, डच इ. प्रमुख जाती आहेत. ससेपालनासाठी उत्तम ठरतील.
ससा पालनाचा खर्च
तुम्ही 100 सशांसह रॅबिट फार्मिंग बिझनेस प्लॅन करू शकतात. यासाठी सुमारे 2 लाख रुपये खर्च असेल आणि त्याच वेळी पिंजरा, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था इत्यादीसाठी तुम्हाला किमान अडीच ते तीन लाख रुपये खर्च करावे लागतील. या व्यवसायात एकदा पैसे गुंतवले की फायदा चांगला मिळतो. ससा 35 ते 45 दिवसांत आपल्या पिल्लांना जन्म देतो आणि ही पिल्ले 4 महिन्यांची झाली की विक्रीसाठी तयार होत असतात. ससे मुख्यतः मांस आणि लोकरीसाठी पाळले जातात. त्याची मांस उत्पादकता बाजारातील इतर सर्व प्राण्यांपेक्षा जास्त आहे.