हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जून महिन्यात पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगामाबाबत राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान जूनमध्ये पाऊसच न झाल्यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील पेरण्या लांबल्या होत्या.

भात लावणीचा विचार करता जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे भाताची लावणं झाली नव्हती. मात्र आता दमदार पाऊस होत असल्याने भात लावणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला असून पेरणीकरिता हीच योग्य वेळ असल्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
काय आहे कृषी विभागाचा सल्ला ?
आतापर्यंत पावसाअभावी रोवण्या रखडल्या होत्या तर आता मुसळधार पाऊस होण्यापूर्वी ही शेतीची काम आटोपून घ्या असं आवाहन कृषी विभागाला करावे लागत आहे कारण आगामी पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसाने अधिक प्रमाणात हजेरी लावली तर रोवणीची कामही खोळंबली जातील अगोदरच कामाला उशीर झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणी काम उरकून उत्पादन कसे वाढेल यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे असं कृषी विभागाने म्हटल आहे