हॅलो कृषी ऑनलाईन: सोयाबीनच्या उत्पादन (Recommendations For Soybean) वाढीसाठी प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावतीद्वारे शेतकरी बंधुंसाठी एकूण 26 शिफारसी प्रसारित केल्या आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Dr. PDKV Akola) अंतर्गत येणार्या प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावतीद्वारे (Regional Research Centre, Amravati) सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी (Higher Production Of Soybean) शेतकरी बंधुंसाठी एकूण 26 शिफारसी प्रसारित केल्या आहेत. यापैकी काही महत्त्वाच्या शिफारसी (Recommendations For Soybean) खालीलप्रमाणे आहेत.
हे सुद्धा वाचा: उच्च उत्पादन, रोग-किडींना प्रतिकारक सोयाबीनचे दोन नवीन वाण विकसित; खरेदी करण्यासाठी ‘येथे’ संपर्क करा!
महत्त्वाच्या शिफारसी (Recommendations For Soybean)
- सोयाबीन पिकामध्ये अधिक उत्पादन, आर्थिक मिळकत व मुलस्थानी जलसंधारणासाठी पेरणीनंतर अंदाजे 30 दिवसांनी सोयाबीनच्या 3 ओळीनंतर सरी काढावी.
- सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी कुटाराचे आच्छादन 5 टन प्रति हेक्टरी व पोटॅशियम नायट्रेट 1% किंवा मॅग्नेशीयम कार्बोनेट 5% किंवा ग्लिसेरोल 5% या बाष्परोधकाची फवारणी पीक फुलोऱ्यानंतर 15 दिवसांनी करावी.
- सोयाबीन पिकाची अवास्तव कायिक वाढ रोखण्यासाठी तसेच अधिक मिळकतीसाठी वाढ रोधक संजीवके क्लोरोमीक्वाट क्लोराईड 1000 पीपीएम (2 मिली प्रति लिटर प्रमाणे) पाण्यात मिसळून पेरणीनंतर 30-40 दिवसांनी फवारणी करावी.
- सोयाबीन पिकांचे अधिक उत्पादन व मिळकतीसाठी शिफारसीत खताची मात्रा व 2 टक्के युरियाची फवारणी (2 किलो युरीया 100 लिटर पाण्यात), पेरणीनंतर 50 ते 70 दिवसांनी करावी किंवा शिफारसीत खतांची मात्रा आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत 2 टक्के डीएपीची फवारणी करावी किंवा 2 टक्के 19:19:19 (नत्र, स्फुरद व पालाश) विद्राव्य खताची फवारणी करावी.
- सोयाबीन पिकामध्ये जास्त उत्पादन मिळवण्यासाठी, नायट्रोवेन्झिन 20% 500 पीपीएम (2.5 मिली/लिटर पाणी) फुलांच्या सुरुवातीच्या टप्प्यावर फवारण्याची शिफारस (Recommendations For Soybean) केली जाते.
- सोयाबीन पिकाचे जास्त उत्पादन व आर्थिक उत्पन्नासाठी सोयाबीनची पेरणी 45 x 10 से. मी. अंतरावर करावी.
- विदर्भातील मध्यम खोल काळ्या जमिनीत सोयाबीनच्या पीडीकेव्ही येलो गोल्ड, सुवर्ण सोया व पीडीकेव्ही अंबा या वाणापासून अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी 62.5 किलो बियाणे प्रति हेक्टरी (कमीतकमी 70 टक्के उगवण शक्तीचे) पेरणी करिता वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे.
- शेंगांवरील करपा रोगाच्या (Soybean Anthracnose) व्यवस्थापनासाठी पेरणीनंतर 55 आणि 75 दिवसांनी कार्बोक्झिन थायरम (3 ग्रॅम/किलो) किंवा कार्बेन्डाझिम+मॅन्कोझेब (2 ग्रॅम/किलो) आणि त्यानंतर 55 आणि 75 दिवसांनी थायोफेनेट मिथाइल 0.1% च्या दोन फवारण्या करण्याची शिफारस केली जाते.
- सोयाबीनच्या मुळकुज/खोडकुज (Soybean Stem Rot/Root Rot) कॉम्प्लेक्स आणि खोडमाशीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोविन+पेनफ्लुफेन 1 ग्रॅम/किलो बियाणे किंवा थायोफेनेट मिथाइल+पायरोक्लोस्ट्रोविन 2 मिली/किलो बियाणे या सोबतच थायमिथोक्झाम 600 एफएस 2 मिली/किलो बियाण्याची बीजप्रक्रिया करण्याची शिफारस (Recommendations For Soybean) करण्यात येत आहे.