हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह संपूर्ण देशात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. येत्या १७ जुलै पर्यंत राज्यात मान्सून चांगल्या पद्धतीने सक्रिय राहील अशी महिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढच्या तीन चार तासात राज्यातील कोकण मराठवाड्यातील काही भाग , विदर्भ मध्य महाराष्ट्र या भागात पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पाऊस
राज्यात राज्यात पुढचे 4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पाऊस शक्यता आहे. कोकण,मध्य महाराष्ट्र काही भागात अतिवृष्टी शक्यता पहिले 2,3 दिवस राहील मराठवाडा मध्ये मध्यम ते जोरदार, विदर्भात ही जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
आज राज्यातील ९ जिल्ह्यांना रेड अलर्ट
8 जुलै
आज दिनांक 8 जुलै रोजी राज्यातील नऊ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पालघर, मुंबई, ठाणे ,रायगड, पुणे ,रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर आज दिनांक 8 रोजी नाशिक आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. नंदुरबार, धुळे, जळगाव बुलढाणा, अकोला, वाशिम, परभणी, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती ,वर्धा ,नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागाला यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरित भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
9 जुलै
दिनांक 9 जुलै रोजी पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सातारा या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होईल मात्र या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर नाशिक, अकोला, वाशिम, परभणी ,नांदेड, यवतमाळ बुलढाणा, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना दिनांक नऊ रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे.