सातबारा आता नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार, खोटी नोंदणी नाहीच ,केवळ 15 रुपयात होणार काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांत पैकी एक असलेला सातबारा आता नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार आहे. राज्यातील बहुतेक ठिकाणी सातबारा हा ऑनलाईन मध्ये मिळवण्याची सेवा सुरु झाली आहे. मात्र आता त्यातही पुन्हा नव्या फॉरमॅटमध्ये हा सातबाराचा उतारा मिळणार आहे याबाबतची घोषणा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक ऑगस्ट रोजी केली आहे.

यावेळी बोलताना मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, आज महसूल दिन त्यानिमित्ताने शुभेच्छा या निमित्ताने काही सेवा सुरू करत आहोत यामुळे सहजता पारदर्शकता आणि बिनचूक सेवा सुरू होईल सर्व सेवा ऑनलाइन असेल सातबारा ऑनलाइन केलाय आज पासून सातबारा नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार आहे. त्यासाठी खूप काम करावं लागलं मिळकत पत्रिका सुद्धा पूर्ण होत आली आहेत टेशन सुद्धा पूर्ण होत आले लवकरच मिळेल चार ठिकाणी जमिनी असतील तर एकच सातबारा मिळेल 2008 पासून ते फेरफार सुद्धा डिजिटल रूपात मिळते त्यामुळे तलाठ्यांचा वेळही वाचणार आहे असं थोरात यांनी म्हटलं आहे.

जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाहीत

–सात बारा काढण्यासाठी 15 रुपये रक्कम भरावी लागेल.
–बँकांसोबत करार करणार आहे. बँक पण सात बारा काढू शकतील. त्याचा नागरिक लाभ घेऊ शकतील.
–खोट्या नोंदी करता येणार नाही.
–फोटो आणि लोकेशन मिळेल.
–गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल.

शेतकरी स्वतः करू शकतील नोंदणी

यावेळी पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “ई पीक पाहणी सुद्धा सुरू आहे. स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार आहेत. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत. तलाठी त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. काही तालुक्यांमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळतोय. टाटा ट्रस्टची मदत मिळत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे पिकांची लागवड कळणार आहे. विमा कवच, अनुदान आणि कर्जाची माहिती देखील मिळणार आहे.”

त्यांच्या बोलण्यावर विश्वस ठेऊ नका

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीवर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “हे वर्ष नैसर्गिक संकटाचे राहिले आहे. कोकणात 2 चक्री वादळे आली, अतिवृष्टी झाली. कोल्हापूर, सांगलीत पूर आला. त्यानंतरही आम्ही जनजीवन सुरळीत केलं. नैसर्गिक संकटाचा फटका बसलेल्यांना मदत झाली पाहिजे हेच आमचं मत आहे.” फडणवीस यांच्या काळात त्यांनी किती कलमे लावली? त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. ते येणार होते आले नाहीत, असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.