Soilless Farming : माती विरहित शेती काळाची गरज; ‘ही’ आहेत तंत्रे आणि खत व्यवस्थापन

Soilless Farming Techniques
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय शेतीचा आतापर्यंत एक वेगळा इतिहास राहिलेला आहे. मात्र आता वाढत्या शहरीकरण आणि हवामान बदलामुळे मातीविरहित शेती (Soilless Farming) करणे ही काळाची गरज बनली आहे. शेतीयोग्य जमीन कमी होत चालली असून, यामुळे शेतीची व्याप्ती कमी प्रमाणात राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु, हीच बाब लक्षात घेऊन मातीविरहित शेती (Soilless Farming) करण्यासाठी प्रोसाहन देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मातीविरहित शेती (Soilless Farming) करताना वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानास प्रामुख्याने व्हर्टिकल फार्मिंग असे नाव दिले जाते. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून, सूर्यप्रकाश उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी जसे की बाल्कनी आणि छतांवर पिकांची लागवड केली जाऊ शकते. यामध्ये केवळ भाजीपाला पिकेच नाही तर औषधी वनस्पती आणि फुलांचे उत्पादन देखील घेतले जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया माती विरहित शेती कशी केली जाऊ शकते.

माती विरहित शेतीची गरज का?

दिवसेंदिवस संसाधनांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे मातीविरहित शेती (Soilless Farming) ही सध्याच्या काळाची मागणी असून, त्या माध्यमातून पाण्याची बचत आणि मातीचे होणारे प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि उत्पादनांमध्ये भरघोस वाढ होऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नगदी पिकांची शेती यशस्वीरित्या केली जाऊ शकते. ज्यामुळे पाण्याची बचत होण्यास मोठी मदत होणार आहे.

मातीविरहित शेतीचे प्रकार (Soilless Farming Techniques)

1. हाइड्रोपोनिक्स तंत्रज्ञान : हाइड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हे माती विरहित शेती करण्याचे एक तंत्रज्ञान असून, या तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जातो. शहरी भागांमध्ये ताजी फळे व भाजीपाला यांचे उत्पादन घेण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. घटत्या शेती क्षेत्रामुळे ही काळाची गरज बनली आहे. संसाधनांची कमतरता आणि कृषी योग्य जमीन उपलब्ध नसेल तेव्हा या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केली जाऊ शकते.

2. एरोपोनिक्स तंत्रज्ञान : एरोपोनिक्स तंत्रज्ञानमध्ये पिकांच्या मुळाशी हवा खेळती राहते आणि माती कमतरता असतानाही वातावरणातील आर्द्रता शोषून घेत पिकांची वाढ होते. मात्र या तंत्रज्ञानामध्ये काही विशिष्ट कालावधीनंतर पिकांच्या मुळाशी पाणी आणि पोषक तत्वांची फवारणी करणे गरजेचे असते. या प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करताना पाणी आणि खतांचा (पोषकतत्वे) वापर हा खूप कमी प्रमाणात होतो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करताना पिकासाठी कोणत्याही कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. कारण पिकांना नियमित वातावरणात वाढवले जाते.

खत व्यवस्थापन कसे करावे?

हायड्रोपोनिक पद्धतीने उगवलेल्या सर्व वनस्पतींना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या तीन मुख्य पोषक घटकांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. याशिवाय सर्व वनस्पतींना कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, लोह, मॅंगनीज, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरीन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील आवश्यकता असते. योग्य प्रमाणात सर्व घटकांचे प्रमाण तुम्ही तुमच्या पिकांना देऊ शकता. याउलट तुम्ही थेट पाण्यात पिके वाढवत असाल तर तुम्ही फक्त द्रव फीड वापरू शकता. सर्व आवश्यक द्रव खते देत तुम्ही पिकांची काळजी घेऊ शकता. परंतु आपल्या विशिष्ट पिकासाठी योग्य पोषण असलेले उत्पादन खरेदी करणे चांगले असते. तुम्ही खाद्यपदार्थ वाढवत असाल तर, भाज्या, फळे किंवा औषधी वनस्पतींसाठी तयार केलेले कोणत्याही एका द्रव खताची निवड करावी.

Gorakshnath Thakare
सकाळ, ABP माझा, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. शेती क्षेत्रात विशेष रस असून शेतमाल प्रक्रिया उद्योग, बाजारभाव, वायदेबाजार, तंत्रज्ञान आदी विषयांची आवड आहे.