हॅलो कृषी ऑनलाईन: कोणताही व्यवसाय हा लहान किंवा मोठा नसतो (Success Story), हे जुन्या काळातील मेहनती पिढीला चांगले उमगले आहे. त्यामुळे निरंतर काहीतरी कार्य करत राहावे आणि त्यातून रोजगार निर्माण (Employment Generation) करावा हेच त्यांचे ध्येय असते. अशाच एका जुन्या पिढीतील व्यक्तीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत (Success Story).
बेरिंग, पेंडळ यांच्या सह तयार केलेले एक यंत्र घेऊन गावागावात शेतकर्यांच्या (Farmers) वाड्या वस्त्यांवर जात अल्प किंमतीत पशुधनाला लागणारे कासरे (Animal Rope) अर्थात चरठ बनवून देत जातेगाव टेंभी तालुका वैजापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील अण्णाभाऊ बत्तीसे (Annabhau Battise) यांनी स्वयंरोजगार (Self-Employment) निर्माण (Success Story) केला आहे.
रोजगार नसल्याने गावाच्या पारावर गप्पा मारत बसलेल्या तर काही अंशी व्यसनाच्या वाटेवर गेलेल्या तरुणाईला अण्णाभाऊ एक उदाहरण आहेत. वयाच्या पन्नाशी ओलांडली असताना देखील गावागावांत दिवसभर वाड्या वस्त्यांवर जात, वापरात नसलेल्या जुन्या साड्या, (Old Clothes) लुगडे यांच्या पासून अवघ्या काही क्षणात कासरे (बनवून देत बत्तीसे यांनी आपल्या उदरनिर्वाहाच्या प्रश्नावर मात केली आहे (Success Story).
बत्तीसे यांच्या कुटुंबाचा वडिलोपार्जित चरठ बनविण्याचा व्यवसाय. पूर्वी केकतड, ताग, सूत आदींपासून ते चरठ बनवत. मात्र काळानुसार कच्चा माल मिळत नसल्याने आता ते शेतवस्तीवर जाऊन त्या कुटुंबाच्या वापरात नसलेली जुनी साडी, लुगडे, यांच्या पासून अवघ्या काही क्षणात कासरे (Success Story) बनवून देतात.
शेतकरी बांधवांना गुरेढोरं बांधण्यासाठी, शेत शिवाराच्या इतर कामासाठी सतत चरठाची गरज असते. अशावेळी बत्तीसे हे घरी येऊन अल्प दरात कासरे करून देत असल्याने शेतकरी घरातील साडी, लुगडे यापासून आवर्जून कासरे बनवून घेतात.
काळानुसार बदल करावा लागतो..
पूर्वी ताग, केकतड मोठ्या प्रमाणात असायची. मात्र आता मिळत नाही त्यामुळे काळानुसार बदल करावा लागला. साडी, लुगडे यापासून देखील मजबूत कासरे तयार होत असल्याने शेतकरी आवर्जून तयार करून घेतात.
काळानुसार आपला व्यवसाय जपणारे आणि मेहनतीच्या जोरावर स्वयंरोजगार निर्माण करणारे अण्णाभाऊ बत्तीसे खरंच प्रेरणादायी (Success Story) आहेत.