Success Story: हजारो कुटुंबांना उपजीविका उपलब्ध करून देणारी उत्तराखंड मधील ‘मशरूम लेडी’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सामाजिक जाणीव असणारी व्यक्ती स्वतः सोबतच समाजाची प्रगती (Success Story) कशी करता येईल यासाठी प्रयत्न करत असते. अशाच एका उद्योजिका बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमोली गढवालयेथे जन्म दिव्या रावत (Divya Rawat) आज “मशरूम लेडी” (Mushroom Lady) म्हणून प्रसिद्ध आहे. दिव्या एक यशस्वी आणि दूरदर्शी उद्योजिका (Success Story) आहे जिने ग्रामीण विकासाची संकल्पना बदलून अनेक लोकांचे जीवन बदलले आहे. तिच्या या उपक्रमामुळे उत्तराखंडमधील सुमारे 15000 कुटुंबांना एक नियमित उपजीविका उपलब्ध झाली आहे, जाणून घेऊ या तिची यशोगाथा (Success Story).

दिव्या रावतने अमिटी नोएडा येथून सामाजिक कार्य या विषयात पदवी आणि इग्नूमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला मानवाधिकार कार्यासाठी तिने स्वत:ला समर्पित केले. हे काम करत असताना एक विदारक वास्तव तिच्यासमोर आले, ते म्हणजे लहान गावातून शहरात स्थलांतरित झालेल्या लोकांची दुर्दशा तिने पाहली. अत्यंत कठीण परिस्थितीत हे लोक राहतात हे दिव्याच्या लक्षात आले. यासर्व परिस्थितीचे मूळ म्हणजे गरिबी आहे हे तिने ओळखले.

बदलाचे बीज: मशरूम शेती

उत्तराखंडच्या खोलवर रूजलेला कृषी वारसा यापासून प्रेरित होऊन दिव्याने शेतीतून उपजीविका करण्याचे ठरवले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सूक्ष्म संशोधन आणि प्रशिक्षणानंतर, तिने मशरूमची लागवड (Mushroom Cultivation) करण्याचे ठरविले. 2013 मध्ये, हे उद्दिष्ट घेऊनच ती चमोलीला परतली (Success Story).

ओसाड गावांमध्ये जीवन भरले

तिने फक्त 15,000 रूपयांची गुंतवणूक आणि दृढ निर्धाराने व्यवसायास सुरुवात केली. दिव्याने कंडारा गावातील रिकाम्या घरांचे मशरूम लागवड केंद्रात रूपांतर केले. तिच्या पुढाकाराने या तथाकथित भुताचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाला जीवदान मिळाले. मशरूम शेतीसाठी (Mushroom Farming) आवश्यक इनडोअर रचना, विशिष्ट तापमान यासाठी तो प्रदेश आदर्श होता.

आर्थिक सक्षमीकरणाचे मॉडेल

मशरूमला बाजारात असलेली उच्च मागणी आणि भरीव परताव्याची क्षमता ओळखून, दिव्याने उच्च मूल्य असलेल्या “किडा जडी” मशरूमच्या जातीची (Keedajadi Mushroom Variety) लागवड करण्यावर लक्ष केंद्रित केले. फक्त 10,000 ते 15,000, रु.च्या सुरुवातीच्या गुंतवणुकीसह तिने अवघ्या 12 वर्षात कोट्यावधी रूपयांचा उद्योग उभारला आहे (Success Story).

वैयक्तिक यश मिळवत असताना दिव्याला समाजासाठी सुद्धा काहीतरी करायचे होते. तिने 15,000 हून अधिक कुटुंबांसाठी एक व्यासपीठ तयार केले आहे, त्यांना उद्योजक (Entrepreneurs) म्हणून सक्षम केले आहे. आर्थिक स्वातंत्र्यामुळे गरिबी आणि शोषणाचे चक्र खंडित होऊ शकते यावर तिचा ठाम विश्वास आहे (Success Story).

महिला सक्षमीकरणासाठी एक उत्प्रेरक

दिव्या ही महिला सक्षमीकरणाची (Women Empowerment) कट्टर बाजू घेणारी आहे. स्त्रिया या घराच्या आणि समाजाच्या शिल्पकार आहेत असे तिचे मत आहे. तिच्या उपक्रमात हजारो महिलांना सामील करून, तिने त्यांना केवळ एक स्थिर उपजीविकाच दिली नाही तर समाजाची आणि आत्मनिर्भरतेची भावना देखील वाढवली आहे (Success Story).

दिव्या तिच्या फाउंडेशन, अवंतम हिमालयन फाउंडेशन आणि सौम्या फूड्‍स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणत आहे. तिच्या या कार्याबद्दल पूर्व राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यातर्फे तिला ‘नारी शक्ती’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे (Success Story).

दिव्या सामाजिक जबाबदारी आणि यशस्वी व्यवसाय करण्यावर जोर देते. समाजाच्या कल्याणाला प्राधान्य देऊन, उद्योजक चिरस्थायी प्रभाव निर्माण करू शकतात. देशाच्या विकासावरही याचा परिणाम होईल असे तिला वाटते. दिव्याचे हे कार्य काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या उद्योजकांसाठी प्रेरणा आहे (Success Story).