जनावरांसाठी उन्हाळा होईल सुसह्य…! गोठ्यात तयार करा नैसर्गिक गारवा, सांभाळा जनावरांचे आरोग्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो उन्हाळा सुरु झाला की ज्या प्रमाणे आपण आपली काळजी घेतो त्याप्रमाणे आपल्या पशुधनाची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात जनावरांना देखील मोठा त्रास होतो. यावेळी गोठा व्यवस्थापन असे करावे की नैसर्गिक गारवा गोठ्यात तयार झाला पाहिजे. उन्हाळयामध्ये जनावरांची योग्य व्यवस्थापन करुन उष्णतेचा ताण कमी करून उत्पादन टिकवून ठेवण महत्वाच असते. जनावरांचे शरिरामध्ये त्यांनी खाल्लेले अन्न, शरिरात साठविलेली चरबी व पोटामध्ये होणारी आबवणक्रिया इत्यादी कारणांनी ऊर्जा निर्माण होते. शरीरात निर्माण झालेल्या उर्जेचा उपयोग शरिरक्रिया चालू ठेवणेसाठी होत असतो, त्याशिवाय अतिरिक्त ऊर्जा जनावराचे शरिर वाढीसाठी व दुधउत्पादन वाढीसाठी उपयोगी असते.

उन्हाळ्यात गोठ्यातील व्यवस्थापन
उन्‍हाळी हंगामात हवा गरम होऊन तापमान वाढते. पशुधनाच्‍या शेडच्‍या पत्र्यावर गवताचे किंवा ऊसाच्‍या पाचटाचे आच्‍छादन केल्‍यास शेडचा पत्रा तापत नाही. या प्रक्रियेमुळे शेडमधील तापमान योग्‍य राहण्‍यास मदत होते. गाय व म्हैस या पशुधनामध्ये उन्हाळा ऋतूमध्ये माजावर येण्याचे प्रमाण कमी होते. यासाठी केवळ चाऱ्याची कमतरता हेच एकमेव कारण नसून गोठा व्यवस्थापन देखील तेवढेच महत्वाचे आहे. गोठयाचे व्यवस्थापन असे करावे की, गोठयातील तापमानामध्ये घट होऊन तापमान आर्द्रता निर्देशांक वाढणार नाही व पर्यायी ऊर्जा संवंर्धीत होऊन गाय व म्हैस माजावर येण्याचे प्रमाण सातत्याने टिकून राहील.

अशा प्रकारे गोठ्यात येईल नैसर्गिक गारवा
–पत्र्याचा ऊसाचे पाचट किंवा इतर आच्छादन करणे गरजेचे असते.
—-जनावरांना गोठयामध्ये थंड जागी किंवा झाडाखाली बांधावे.
–गोठयाच्या छपरावर गवत, पाला पाचोळा टाकून पाणी शिंपडावे त्यामुळे गोठा थंड राहातो.
–एकाच गोठयात जास्त जनावरांना एकत्र डांबून गर्दी केल्यास उष्माघात चा त्रास होऊ शकतो.
— शक्य झाल्यास खिडक्यांना पोती ओली करून लटकवा. त्यामुळे गोठ्यात हवा बाहेरून प्रवेश करताना थंड होऊन आत जाईल आणि गारवा निर्माण होईल

उन्हाळ्यात जनावरांची घ्या काळजी

–उन्हाळयामध्ये जनावरांना ३-४ वेळा थंड पाणी पाजावे.
–आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा.
–जनावरांना उन्हाळयात दुपारच्या वेळेस चरण्यासाठी पाठवू नये.
–गोठयामध्ये अधूनमधून पाणी फवारावे. रात्री व पहाटेच्या समयी वाळलेली वैरण भरपूर दयावी.
–दुपारच्या प्रहरी हिरवी मका, चवळी, कडवळ, लसूण घास यासारखी पोषक वेरणा दयावी. त्यामुळ दूध उत्पादन सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमताही सुधारते.
–खादयातून अ जीवनसत्वाचा पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त हिरवा चारा दयावा.
–उन्हाळयात जनावरांना लाळखुग्कृत व फ-या या सारख्या रोगांची रोगप्रतिबंधक लस योग्य वेळी टोचून घेणे गरजचे आहे.
दुभत्या जनावरांप्रमाण लहान वासर, कालवडी, पारडया, भाकड जनावर व गाभण जनावरे यांच ह योग्य ती काळजी घ्यावी त्यामुळे निश्चितच फायदा होईल.

माजावर आलेल्या जनावरांची घ्या विशेष काळजी
उन्हाळयामध्ये माजाचा कालावधी कमी असतो. ब-याच वेळा मुकामाज जाणवतो. म्हशीमध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. त्यासाठी थंड प्रहरी जनावरांचे बारकाईने निरिक्षण करुन माजाची लक्षणे पहाणे किंवा खच्चीकरण केलेला वळू जनावरामाग फिरवून माजावरील जनावरे ओळखता येतील. माजावर आलेली –जनावरे दुपारच्या वेळेस न भरवता त्याऐवजी सकाळी किंवा उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर भरविल्यास गर्भधारणीचे प्रमाण वाढून जनावर उन्हाळयातही गाभण राहतील.