अवकाळीने महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; 460 हेक्टरवरील स्ट्रॉबेरीचे नुकसान

हॅलो कृषी ऑनलाइन : सकलेन मुलाणी सातारा डिसेंबर महिन्याच्या सुरवातीस मॉन्सूनोत्तर झालेल्या पावसामुळे महाबळेश्वर,जावळी, वाई तालुक्यांतील स्ट्रॉबेरी पिकांस फटका बसला आहे. कृषी विभागाकडून नजर अंदाजे करण्यात आलेल्या पाहणीनुसार तीन तालुक्यांतील ४६० हेक्टर स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे.त्यामध्ये सर्वाधिक महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ४५० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने येथील शेतकरी कोलमडल्याचे चित्र आहे. राज्यासह देशात महाबळेश्वरच्‍या स्ट्रॉबेरीचा गोडवा … Read more

तू चाल गाड्या …! अवकाळीच्या संकटावर अनोखी शक्कल ;शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीला घातला रेनकोट

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा मागच्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पण प्रत्येकवेळी येणाऱ्या संकटाला तोंड देत शेतकरी पुन्हा उभा राहतो. पुन्हा नव्या आशेने काळ्या मातीतून मोती पिकवण्याचा प्रयत्न करतो. दिवसेंदिवस अवकाळी पावसाचे प्रमाण वाढतच चाललंय… या अवकाळी पावसातून आपल्या पिकाला वाचवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात. सातारा जिल्ह्यातील वाई … Read more

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, सडलेल्या स्ट्रॉबेरी फेकून देण्याची वेळ

हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे .या पावसाच्या माऱ्यामुळे सडलेली आणि नरम पडलेली स्ट्रॉबेरी अक्षरशः बांधावर फेकून द्यावी लागली आहे. स्ट्रॉबेरी म्हटलं की डोळ्यासमोर येथे महाबळेश्वर… पण याच महाबळेश्वरच्या शिवारात फिरताना तुम्हाला स्ट्रॉबेरीचा खच पडलेला दिसेल. राज्यावर आलेल्या अवकाळी पावसाच्या संकटाने आता स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना … Read more

मेळघाटात 10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन

amravati

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात स्ट्रॉबेरी पीक म्हंटल की चटकन डोळयासमोर महाबळेश्वर हे ठिकाण समोर येते पण अमरावती येथील मेळघाटातही आता स्ट्रॉबेरीचे पीक घेतले जाऊ लागले आहे. पारंपरिक पिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळला आहे. स्ट्रॉबेरी या पिकाने येथील शेतकऱ्यांना एक आर्थिक उत्पन्नाचा मार्ग दाखवला. या पिकाला अपेक्षित असलेले हवामान व … Read more

error: Content is protected !!