सातबारा उताऱ्यावर खरेदी दस्ताची नोंद करण्यासाठी तलाठी घेत होता लाच; शेतकऱ्यानं केली आयडिया

Money
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर दस्ताची नोंदणी करून देण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी करून २५ हजार रुपये लाच घेणाऱ्या देशिंगच्या तलाठ्यासह कोतवालास रंगेहात पकडण्यात आले. देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील तलाठी कार्यालयात सापळा लावून लाच लुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली. तलाठी सचिन रघुनाथ पाटील (वय ३८ रा. मिरज) आणि कोतवाल आनंद शिवा पाटील (वय ४९ रा. देशिंग) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , तक्रारदार यांनी खरेदी केले जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर खरेदी दस्ताची नोंद करून देण्यासाठी देशिंग येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. सदरची नोंदणी करण्यासाठी तलाठी साची पाटील यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदार यांनी सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दिलेल्या तक्रारीनुसार सोमवार दि. ११ एप्रिल रोजी पडताळणी केली असता त्यामध्ये तलाठी सचिन पाटील यांनी खरेदी केले जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर खरेदी दस्ताची नोंद करून देण्यासाठी ३० हजार रूपये लाचेची मागणी करून चर्चेअंती २५ हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे तसेच कोतवाल आनंदा पाटील यांनी तलाठी सचिन पाटील यांना लाच देण्यासाठी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर देशिंग येथील तलाठी कार्यालयच पथकाने सापळा लावला असता तलाठी सचिन पाटील यांना २५ हजार रूपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच बरोबर कोतवाल आनंदा शिवा पाटील यांचा देखील या प्रकरणात सहभाग असल्याने त्यांना ताब्यात घेतले. या दोघांविरोधात कवठेमहंकाळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुजय घाटगे, अविनाश सागर, संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ, सलिम मकानदार, राधिका माने, सिमा माने, बाळासाहेब पवार यांनी केली.