सोमवारपासून पावसाचा प्रभाव होणार कमी, पहा राज्यात कोणत्या भागात किती पाऊस ?

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज दिनांक 19 आणि उद्या तारीख 20 रोजी कोकण आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडतील. सोमवार पासून राज्यातील पावसाचा प्रभाव मात्र काही अंशी कमी होणार असून विदर्भाच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण बदलले आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात ढगाळ वातावरणासह अधून-मधून ऊन पडत आहे. काही ठिकाणी हलक्‍या ते माध्यम सरी बरसत आहेत. हवेत बर्‍यापैकी गारवा तयार झाल्याने मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. उन्हाळ्यात असहाय्य झालेला उघडा आता कमी होऊ लागल्याने कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. शुक्रवारी मालेगाव इथे 37.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

पूर्व विदर्भात होत असलेल्या हलक्या पावसामुळे सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसची घट झाली. त्यामुळे कमाल तापमान 29 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही 20 ते 37 अंश सेल्सिअस, मराठवाड्यातही तापमान 29 ते 35 अंश सेल्सिअस तर कोकणात 29 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान होते.

या जिल्ह्यात होणार पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ या जिल्ह्यात पाऊस होणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मागील २४ तासात पावसाची आकडेवारी

मागील 24 तासात माथेरान इथं 121.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोल्हापूर 41.4, सातारा 37.6, ठाणे ४२, पणजी 50.7 महाबळेश्वर 185. 3, रत्नागिरी 83, देवरूख 92, खेड 165, दापोली 175, चीपळून 190, राजापूर 94, लांजा 108, गुहागर 225, पुणे 38.7