हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या फळउत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ज्या फळांना ‘जीआय टॅग’ मिळाले आहे त्याच फळांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे ‘जीआय’ प्रदान झालेल्या फळाचे महत्व वाढणार आहे शिवाय शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
राज्यातील 20 हून अधिक फळांना भौगोलिक मानांकन प्रदान करण्यात आलेले आहे. त्यामुळे या फळांसोबत इतर फळांचाही दर्जा आपोआपच वाढणार आहे. मार्केटींगच्या अनुषंगानेच सरकार प्रयत्न करीत आहे. नाशिकच्या द्रांक्षांपासून ते कोकणच्या आंब्यापर्यंत इतरही फळांना बाजारभाव जास्त कसा मिळेल शिवाय या फळांनाही नामांकन मिळाल्याचा फायदा कसा करून घेता येईल यासाठी राज्य सरकार आता उपक्रम राबवणार आहे.
राज्यातल्या शेतकऱ्यांना फायदा
–वाढत्या उत्पादनाबरोबर त्या उत्पादनाचा इतिहास, दर्जा, सातत्य, वैशिष्ट आणि मागणी यावर भौगोलिक मानांकन दिले जाते.
–यावरून फळाचा दर्जा ठरतो तर फळाची एक वेगळी ओळख निर्माण होते.
–फळ उत्पादकांना मानांकन मिळाल्याने अधिक उत्साह वाढतो व त्या फळाविषयी आपलेपणा निर्माण होतो.
–एवढ्यावरच न थांबता याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे.
–जीआय प्रदान करण्यात आलेल्या फळांची मार्केटींग करुन त्याचे महत्व सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचा उपक्रम आता राज्य सरकारच राबवणार आहे.
–केवळ उत्पादनच नाही तर लागवड पध्दतीपासून ते बाजारपेठ इथपर्यंतचे मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना केले जाणार आहे.
–मानांकन मिळालेल्या फळा व्यतिरीक्त फळ उत्पादकांनाही मानांकनासाठी नोंदणी करण्याची पध्दत ही सांगितली जाणार आहे.