राज्याचे कृषीमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, कृषी विभागाला अडचणी दूर करण्यासंबंधी दिल्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकऱ्यांच्या समस्या कृषी मंत्री दादा भुसे यांनी जाणून घेतल्या. धुळे येथील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला.

नाशिक धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीस आलाय. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येऊन ठेपला आहे. या जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्य कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या कडून सरवड शिवारात पिकांची पाहणी करण्यात आली तसेच तेथील शेतकऱ्यांसोबत भुसे यांनी संवाद साधला.

यावेळी शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे अनुदान मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने कालबद्ध विशेष अभियान राबवावे असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहत त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर कराव्यात असेही कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील गाव शिवारातील संजय गायकवाड यांच्या कपाशीच्या शेतीला भेट दिली यावेळी कीटकनाशकांचा नियोजनात्मक वापर करून योग्य खत आणि कीड व्यवस्थापन करण्याचे मार्गदर्शन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलं.