राज्यात पुढील 4 दिवस अशी असेल पावसाची स्थिती; जाणून घ्या

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील बहुतेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्रा काही भागात अद्यापही अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान पुढील 3 तासात पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

3-ऑगस्ट – रोजी नाशिक पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या भागात यलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.

4- ऑगस्ट – उद्या म्हणजे 4 ऑगस्ट रोजी पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

5-ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट करिता हवामान खात्याने राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केलेला नाही.

या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

पंजाब वगळता पुढील पाच दिवस उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात वेगवान मुसळधार पावसाची शक्यता आहे येत्या तीन दिवसात हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात वेगवान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.त्यामुळे या राज्यातील काही भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत कसा असेल पाऊस ?

–मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये पाऊस सामान्य, सकारात्मक असेल. तसेच 95 ते १०५ टक्के पाऊस होईल अशी संभावना आहे.
— दुसऱ्या टप्प्यामध्ये देशभरामध्ये सर्वत्र चांगला पाऊस होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण देशामध्ये काही भागांमध्ये सामान्य ते सामान्य पेक्षा अधिक पाऊस पडण्याची संभावना आहे.
— ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये पाऊस सामान्य राहील आणि त्यांची संभावना 94 ते 106 टक्के असेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.