झणझणीत ‘किंग चिली’ थेट लंडनला रवाना ; पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केला आनंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशातील अनेक शेती उत्पादने ही प्रदेशात निर्यात केली जातात. जगातील सर्वात तिखट असलेल्या मिरचीची निर्यात भारतातून लंडनच्या बाजारपेठेत करण्यात आली आहे. नागालँड मधील ‘किंग चिली’ किंवा ‘भूत जोलकिया’ अशी ओळख असलेली मिरची पहिल्यांदा लंडनच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करू आयाबाबत आनंद व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘अतिश्य उत्तम बातमी. ज्या लोकांनी भूत जोलकिया मिरची खाल्ली आहे त्यांनाच या मिरचीच्या तिखटपणाची कल्पना आहे, असे मोदींनी म्हटले. तर वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनीही ईशान्य भारतातील मिरची लंडनमध्ये पोहोचल्याचे म्हटले आहे. ही मिर्ची गुवाहाटीमधून पाठवण्यात आली आहे. या मिरचीची पहिली खेप नुकतीच लंडनमध्ये पोहोचली. आता आगामी काळात ही मिरची लंडनवासियांच्या कितपत पसंतीस उतरणार, हे पाहावे लागेल.

जगातील सर्वात तिखट मिरची

Scoville हीट यूनिट (SHUs) नुसार भूत जोलकिया ही जगातील सर्वात तिखट मिरची आहे. 2008 साली ही मिरची प्रमाणित करण्यात आली होती. जुलै 2021 मध्ये लंडनमध्ये या मिरचीचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर लंडनमधून या मिरचीसाठी ऑर्डर आली. ही मिरची पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने पिकवण्यात आली आहे. ही मिरची लवकर खराब होत असल्याने तिची निर्यात करण्यात अनेक समस्या होत्या. मात्र, या सर्व अडचणींवर मात करुन नागालँड कृषी बाजार समितीने ही मिरची लंडनमध्ये पाठवली