हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन बरेच शेतकरी करतात. दुग्धव्यवसायातून मोठा फायदा होतो . आज आपण अशा एका देशी गायीबद्दल माहिती घेणार आहोत जी ५० लिटरपर्यंत दूध देते. या गायीचे नाव आहे गीर गाय …
काय आहेत गीर गायीची वैशिष्ट्य
–या जातीची गाय दिवसाला 50 लिटरपर्यंत दुध देण्यास सक्षम आहे.
–हि एक गाईची देशी/गावठी जात आहे.
–कमी खर्चात अधिक दुग्ध उत्पादन घेण्यासाठी गीर गायीला पसंती
–गीर गाईचे तूप, दूध, गोमूत्र आणि शेणही चांगल्या दराने विकले जाते.
— गीर गाईची रोगप्रतिकारशक्तीही जास्त असते
–सेंद्रिय शेती करणाऱ्यांकरिता फायदेशीर
गीर गायीच्या जाती
–गीर गाईच्या प्रामुख्याने दोन जाती आहेत. स्वर्ण कपिला आणि देवमणी या प्रगत जाती मानल्या जातात.
–गीर गाय मुख्यतः लाल रंगाची असते.
–ह्या जातीच्या गाईचे कपाळ रुंद व कान लांब असतात.
–तसेच ह्या जातीच्या गाईचे शिंगे लांब आणि वाकलेली असतात.
–या जातीच्या कासेचा पूर्ण विकास झालेला असतो.
दिवसाला 50 लिटर दुग्धउत्पादन क्षमता
डीडी किसान या वाहिनीनुसार, गीर गाय हि दिवसाला 50 लिटर दुध देण्याची क्षमता ठेवते. या जातींचे आयुष्य हे जवळपास 15 वर्षापर्यंत असल्याचे सांगितलं जाते. गीर गाय आपल्या संपूर्ण आयुष्यात 12 वासरांना जन्म देऊ शकते. गीर गाईचे वजन हे साडे चारशे किलोपर्यंत असते. गीर गाईला जर चांगला आहार दिला गेला तर दिवसाला हि गाय 50 लिटरपर्यंत दुध देऊ शकते.