हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा उन्हाळी सोयाबीनच्या पेरण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते आहे. यापूर्वी खरिपातील सोयाबीनची बियाणे म्हणून उन्हाळी सोयाबीनची लागवड प्रामुख्याने केली जात होती मात्र आता यंदाच्या वर्षी बियाणे आणि विक्री दोन्हीच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर पुण्यासारख्या उसक्षेत्रावरही उन्हाळी सोयाबीनची लागवड केलेली दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी राज्यात 40 हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा दहा हजार हेक्टरवर होता.
राज्यात सोयाबीनची 45 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात सोयाबीन लागवड करण्यात आली आहे. सोयाबीनचे उत्तम बियाणे निर्मण व्हावेत आणि शेतकऱ्यांना ते उपलब्ध व्हावेत याकरिता कृषी विभागाने देखील प्रयत्न केले. राज्यात लातूर आणि औरंगाबाद मध्ये अनुक्रमे 14000 आणि 13,879 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झालेल्या याशिवाय ऊस पट्टा साठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर पुण्यामधे अनुक्रमे 3155 आणि 2816 आहेत तर शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पेरला.
… म्हणून उन्हाळी सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ
–उत्तम बियाणे उपलब्ध व्हावेत.
–सोयाबीनला मिळणारा चांगला दर हे प्रमुख कारण आहे.
–मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने पाण्याची पुरेशी उपलब्धता आहे.
— तेलबिया आणि सोयाबीन या दोन्ही स्वर स्टॉक लिमिटेड लागू केली तरीही सोयाबीनचे दर खाली आले नाहीत.
–मागील वर्षी मिळालेला विक्रमी दहा हजारांचा भाव.