Tur Bajar Bhav: तुरीला ‘येथे’ मिळाला हंगामातील सर्वोच्च भाव! जाणून घ्या बाजाराचे हाल 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: तुरीला या हंगामातील सर्वोच्च दर (Tur Bajar Bhav) मिळाला आहे, त्यामुळे तूर उत्पादक शेतकर्‍यांसाठी (Tur Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तुरीच्या दरात (Tur Bajar Bhav) झालेल्या वाढीमुळे तूर उत्पादक शेतकर्‍यांना चांगला फायदा मिळत आहे.

या आठवड्यात अकोल्यात तुरीला (Tur) या हंगामातील सर्वोत्तम भाव मिळाला आहे. अकोल्यात (Akola) सध्या तुरीचे भाव 12000 ते 13,500 रुपये दरम्यान आहेत.

अकोल्यात उच्च प्रतिच्या तुरीला 13 हजार 800 रूपयांचा दर (Tur Bajar Bhav)

या आठवड्यात अकोल्यात तुरीला हंगामातील सर्वोत्तम भाव मिळाला आहे. अकोल्यात तुरीचे भाव (Tur Bajar Bhav) सध्या 12000 ते 13,500 रुपये दरम्यान आहेत. दोन दिवसांपूर्वी अकोल्यात उच्च प्रतिच्या तुरीला 13 हजार 800 रूपयांचा प्रति क्विंटल भाव मिळाला होता. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तुरीची आवक सुरू झाली आहे. या वर्षी तुरीला सरकारने 7000 रूपये किमान आधारभूत मूल्य दिले आहे. मात्र, सध्या हमीभावापेक्षा तुरीला जास्त दर मिळत आहे.

हंगामाच्या सुरुवातीला तुरीच्या घरात झाली होती घसरण

यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला तुरीचे भाव (Tur Bajar Bhav) पडल्याने तूर उत्पादक शेतकरी (Farmers) हवालदिल झाला होता. मात्र, अलीकडे बाजारात तुरीच्या वाढत्या मागणीमुळे तुरीला अच्छे दिन आल्याची परिस्थिती आहे. अकोल्यात सध्या तुरीला सरासरी 12000 एवढा सरासरी भाव प्रति क्विंटलला मिळत आहे. मात्र, या वाढलेल्या भावाचा फारसा फायदा शेतकर्‍यांना  होत नसल्याची खंत काही शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या आठवड्यात अकोला बाजार समितीत तुरीला मिळालेले भाव

तारीख      सरासरी भाव (प्रति क्विंटल)

08 जून       13905

09 जून       12920

10 जून       13800

11 जून       12500

12 जून       11300

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.