हॅलो कृषी ऑनलाईन: आवक कमी झाल्याने हळदीच्या भावात (Turmeric Rate) उसळी आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील (Krushi Utpanna Bajar Samiti Market Yard) हळदीची आवक आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे हळदीच्या दराने (Turmeric Rate) उच्चांकी घेतली असून, सोमवारी लिलाव बाजारात हळदीला 18 हजार 100 रुपये प्रति क्विंटल भाव (Turmeric Bajar Bhav) मिळाला आहे.
मागील महिन्यात आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. दररोज चार ते पाच हजार पोते हळदीची आवक व्हायची. पण, आता शेतकऱ्यांकडील हळद जवळपास 70 ते 80 टक्के थेट बाजारात विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे हळदीची आवक आता कमी झाल्याने दराने उसळी घेतली आहे. मागील महिन्यात हळदीचे भाव (Turmeric Rate) 16 हजारावर स्थिरावले होते. मात्र, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोमवारी झालेल्या लिलाव बाजारात कमीत कमी 15 हजार 600 रुपये, तर जास्तीत जास्त 18 हजार 100 रूपयांचा भाव मिळाला, तर सरासरी 16 हजार 800 रूपयांपर्यंत हळदीची विक्री झाली आहे. येत्या काही दिवसांत हळदीचे दर वाढतील, या आशेने काही मोठ्या शेतकर्यांनी हळद साठवून (Turmeric Storage) ठेवली होती त्याचा या शेतकर्यांना (Farmers) फायदा झाला.
हिंगोलीत कसा मिळतोय भाव? (Turmeric Rate)
हिंगोली (Hingoli) येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी तीन हजार क्विंटल हळदीची आवक झाली. या हळदीला सरासरी 16 हजार 400 रूपयांचा भाव मिळाला. दरम्यान, गत आठवड्याच्या तुलनेत पाचशे रूपयांनी भाव वधारल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला. 27 मे रोजी 2 हजार 825 क्विंटल हळदीची आवक झाली होती. 15 हजार 300 ते 17 हजार 500 रुपया दरम्यान भाव मिळाला. तर सरासरी 16 हजार 400 रुपये भाव मिळाला (Turmeric Rate).