हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट योज़न भारतभर राबवली जात आहे. या योज़नेअंतर्गत एका विशिष्ट जिल्ह्यासाठी एका पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. महाराष्ट्रातही ह्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योज़नेसाठी राज्यातल्या बुलढाणा जिल्ह्याची निवड करण्यात अली असून या अंतर्गत पेरू लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.
‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ मुळे त्या विशिष्ट जिल्ह्यातील विशिष्ट पिकाला एक वेगळी ओळख निर्माण होईल तसेच त्या पिकाच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना फायदा होईल, त्या पिकाला जास्त मागणी येईल आणि साहजिकच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीने आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यासाठी ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ अन्वये पेरू पिकाची निवड केली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील पेरू उत्पादनाला चालना मिळणार आहे, तसेच पेरू उत्पादक शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रात फळबागांची लागवड ही लक्षणीय आहे, द्राक्षे, डाळिंब,संत्रा इत्यादी फळांची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते.
आणि अशातच ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ नुसार पेरू पिकाची बुलढाणासाठी झालेली निवड ही महत्वपूर्ण ठरणार आहे. ह्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात पेरू लागवडीला चालना मिळेल आणि महाराष्ट्र पेरू लागवडीत आपले एक विशिष्ट स्थान निर्माण करेल. पेरू हे फळबाग पिकांमध्ये एक महत्वाचे फळ आहे. ह्याची शास्त्रीय पद्धतीने लागवड करून शेतकरी चांगली मोठी कमाई करू शकतात. पेरू हे आरोग्यासाठी देखील खुप चांगले असल्याचे सांगितले जाते. पेरू मध्ये कॅलरी कमी असते व फायबर जास्त असतो तसेच कोलेस्ट्रॉल नगण्य असते. पारंपारिक पिकाला फाटा देऊन शेतकरी पेरू लागवडीतून चांगली कमाई करू शकतात.