हॅलो कृषी ऑनलाईन: अतिवृष्टीमुळे पिकांचे (Crops Management) मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गेल्या महिन्याभरापासून राज्यात मुसळधार पाऊस (Excessive Rainfall) सुरू आहे. विशेषत: सातारा, कोल्हापूर, विदर्भ आणि कोकण भागात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यातच हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पिकांचे अजून जास्त नुकसान होऊ नये यासाठी शेतकर्यांनी वेळीच काही उपाय करणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या वेगवेगळ्या पिकांचे (Crops) नियोजन (Crops Management) .
अतिवृष्टीच्या ठिकाणी पिकांचे व्यवस्थापन (Crops Management)
- पावसाची उघडीप पाहून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा उपलब्ध असल्यास ज्वारी पिकास पेरणीनंतर 30 दिवसांनी नत्र 50 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे द्यावे.
- वाढलेल्या आर्द्रतेमुळे व ढगाळ हवामानामुळे ज्वारी पिकावर खोडमाशीचा (Stem Fly Control) प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी 25% प्रवाही क्विनोलफॉस 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून व वारा शांत असताना फवारणी करावी.
- मूग पिकात (Crops Management) फुलोरा ते शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी रोगाचा (Powdery Mildew Control) प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी बांधवांनी पावसाची उघडीप पाहून नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम या बुरशीनाशकाची 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात मिसळून फवारणी करावी.
- मूग पिकात पिवळा विषाणू या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो. हा रोग पांढरी माशी (White Fly) या किडीमार्फत होतो. व्यवस्थापनासाठी एकरी 15 पिवळे व 5 निळे चिकट सापळे (Sticky Traps Use) लावावेत. रोगट झाडे उपटून नष्ट करावीत.
- भुईमुग (Crops Management) लवकर पेरणी केलेल्या पिकामध्ये शाखीय वाढ अवस्थेत कोळपणी करून घ्यावी.
- सततचा पाऊस आणि हवेतील आर्द्रता यामुळे भुईमुग पिकावर टिक्का (Tikka Disease) आणि तांबेरा (Groundnut Rust Disease) रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पावसाची उघडीप पाहून फ्लुबेंडियामाइड 3.5% + हेक्साकोनाझोल 5% डब्ल्यूजी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा अतिरिक्त निचरा करण्याची व्यवस्था करा
- ढगाळ वातावरणामुळे मिरचीच्या झाडावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी @5 मिली किंवा पायरीप्रॉक्सीफेन 10 % ईसी @15 मिली प्रति 10 लिटर पाणी फवारणी करा. पिवळे चिकट सापळे 10 ते 12 प्रति एकर वापरा.
- भात पिकाच्या (Crops Management) वाढीच्या अवस्थेनुसार भात खाचरातील पाण्याची पातळी रोपे लावल्यापासून ते स्थिर होईपर्यंत 1 ते 2 सें.मी. व रोपांच्या वाढीच्या अवस्थेत 2 ते 3 सें.मी. ठेवावी.
- ढगाळ हवामान आणि हलक्या पावसामुळे काही भागात सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा या पाने खाणाऱ्या अळीचा (Soybean Leaf Eating Caterpillar) प्रादुर्भाव दिसून येतो. सुरवंटाच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टर 5 फेरोमोन सापळे बसवा.
- हळद कंद उघडे राहू नयेत यासाठी लागवडीनंतर लागवडीनंतर 10 ते 12 आठवड्यांनी मातीने भरणी करावी (Turmeric Earthing Up). भरणी करताना 2 टन निंबोळी पेंड आणि 100 किलो नायट्रोजन प्रति हेक्टर डोस द्यावा.