परभणीत प्रकल्प आत्माचा ‘रानभाज्या महोत्सव’ !

ranbhajya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे

शेतातील विषमुक्त व पौष्टिक रानभाज्यांची माहीती पुढील पिढीला व्हावी या चांगल्या हेतुने जिल्हात ‘रानभाज्या महोत्सव सप्ताहाचे ‘ प्रकल्प आत्मा व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे . 12 ऑगष्ट रोजी सकाळी 9 ते 1 या वेळात जिल्ह्यातील पाथरी शहरांमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .

पाथरी शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे आयोजित कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून तालुका कृषी अधिकारी व्ही .टी . शिंदे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून जनवादी प्रतिष्ठानचे बाळासाहेब गायकवाड कृषी मंडळ अधिकारी एस .एम . फुलगार ,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल दलाल, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक नितिन जाधवर व शेतकरी मित्र , स्वामी समर्थ सेवा केंद्र पाथरीचे विशाल डफुरे आदींची उपस्थिती होती . यावेळीगोवर्धन सेंद्रिय शेती गट बाभळगाव , लताई शेतकरी गट बोरगव्हाण , रेणुकामाता महिला शेतकरी गट रेणाखळी , एकता महिला बचत गट बांदरवाडा या स्थानिक गावातीलगटांनी रानभाज्या महोत्सवासाठी आणल्या होत्या .

यावेळी या महोत्सवाचे महत्त्व विशद करताना प्रकल्प आत्माचे विशाल दलाल यांनी “रानभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक , जीवनसत्वे व खनिजे असतात . रानभाज्या या औषधी गुणधर्माबाबत परिपुर्ण असतात . तसेच रानभाज्या ह्या विनाफवारणी , खताचा वापर न करता व शिवाय नैसर्गिकरित्या उगवलेल्या असल्यामुळे विषमुकत असतात अशी महोत्वासाला भेट देणाऱ्या नागरीक व शालेय विद्यार्थी यांच्याशी संवाद साधत माहिती दिली .

तर प्रकल्प आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक नितिन जाधवर यांनी,”अशा विविध रानभाज्यांची शहरी ग्राहकांना ओळख व्हावी , आहारातील त्यांचे महत्व पटावे या अनुषंगाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ” , असे हॅलो कृषीशी बोलताना सांगितले . दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये चार तासाचे हे प्रदर्शन भरविण्यात येत असूनयावेळी जिल्हावासीयांना विलुप्त होत असलेल्या दुर्मिळ अशा रानभाज्यांची ओळख होत आहे .