हॅलो कृषी ऑनलाईन : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने(डिप्लोमा ,पदवीधारक ) विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा राज्यात पशु आरोग्य सेवेवर परिणाम झाला असल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आंदोलनामुळे पशुसेवा मिळणाऱ्या अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र आरोग्य सेवेवर परिणाम झाला नसून सर्व आरोग्य सेवा सुरळीत सुरू असल्याचं सांगितलं आहे.
मंगळवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता. राज्यातील 2853 पशु आरोग्य संस्थांमधील 4500 पशुचिकित्सा व्यवसायी काम करत आहेत. त्यातील पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी बहुतांश लोक आंदोलनात सहभागी आहेत. सेवेवर 50 टक्क्यांपेक्षा जास्त परिणाम झाल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळला आहे. सर्व पशु सेवा सुरळीत सुरू आहे. पशू सेवा मिळत नसल्याबाबत एकही तक्रार नाही असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. दरम्यान पशुचिकित्सा व्यवसायी यांचाही आंदोलनाला पाठिंबा असून सरकारने मागण्या गांभीर्याने घ्याव्यात अशी मागणी डॉक्टर कृषिराज टकले यांनी केली आहे.